राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेचा सुवर्ण पदकावर कब्जा
By Admin | Updated: January 1, 2016 05:41 IST2016-01-01T01:00:43+5:302016-01-01T05:41:34+5:30
रेल्वेचा कसलेला मल्ल राहुल आवारे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल ६१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेचा सुवर्ण पदकावर कब्जा
नवी दिल्ली : रेल्वेचा कसलेला मल्ल राहुल आवारे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाइल ६१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याचवेळी महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळे याने देखील कांस्य पदकाची कमाई करताना ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात एकहाती वर्चस्व राखले.
उत्कर्ष काळेने कांस्य पदक पटकावताना ५७ किलोवजनी गटात महाराष्ट्राचा झेंडा फडकावला. अखेरच्या काही क्षणात उत्कर्षने अप्रतिम पकडी करताना सुमितला चुका करण्यास भाग पाडून सहजपणे सुवर्ण पटकावले. त्याचवेळी भारताची स्टार महिला खेळाडू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी अपेक्षित
कामगिरी करताना फ्रीस्टाइलच्या अनुक्रमे ५३ व ६० किलोवजनी गटात बाजी मारली. विनेशने आपल्या लढतीत एकहाती वर्चस्व राखताना ममता रानीला सहजपणे लोळवत सुवर्ण जिंकले. प्रो कुस्ती लीगमध्ये विनेश सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली
होती. दुसऱ्या बाजूला ६० किलो वजनी गटात साक्षीने शानदार खेळ करताना मनीषाचे आव्हान परतावून सुवर्ण पदकावर नाव कोरले.