रुनी इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:44+5:302014-08-28T20:55:44+5:30
लंडन : वेन रुनी याला आज इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुनीला आता विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणार्या अनुभवहीन संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे.

रुनी इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार
ल डन : वेन रुनी याला आज इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रुनीला आता विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणार्या अनुभवहीन संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे.इंग्लंडचे प्रशिक्षक राय हॉजसन यांनी म्हटले, तो निश्चितच या पदाचा दावेदार आहे आणि आपल्या कार्याप्रती तो प्रतिबद्ध आहे. तो इंग्लंडच्या कर्णधारपदाचा दबाव सहन करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.हॉजसन यांनी युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वीत्झर्लंडविरुद्ध होणार्या क्वॉलिफायर आणि नॉर्वेविरुद्ध बुधवारी होणार्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी संघाची घोषणा करताना वेन रुनीला कर्णधार नियुक्त करण्यास दुजोरा दिला.डिफेंडर कॅलम चेंबर्स आणि डॅनी रोस व मिडफिल्डर जॅस कोलबॅक आणि फॅबियन डेल्प यांचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. रुनीला स्टीव्हन गेरॉर्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधार करण्यात आले आहे. चाहत्यांशी खराब संबंध आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात रेड कार्ड मिळाल्यामुळे त्याच्या स्वभावाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हानंतरही या स्ट्रायकला प्रतिष्ठित मानले जाणारे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रुनीला मॅन्चेस्टर युनायटेड संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.२८ वर्षीय रुनीने चाहत्यांचा आपल्याला पूर्णपणे पाठिंबा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. मैदानावर उतरल्यानंतर आपण फक्त विजय मिळवण्याचाच विचार करतो आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावू इच्छितो, असेही तो म्हणाला.