भारतात प्रथमच ‘कैनोपी’ शैलीचे पिच कव्हर

By Admin | Updated: November 12, 2015 23:19 IST2015-11-12T23:19:33+5:302015-11-12T23:19:33+5:30

भारतातील क्रिकेट स्टेडियममध्ये असलेली ड्रेनेज प्रणाली नेहमी टीकेचे लक्ष्य ठरली आहे. त्यात ईडन गार्डन्स सर्वांत अधिक निशाण्यावर असते, पण कर्नाटक राज्य क्रिकेट

'Canopy' style pitch cover for the first time in India | भारतात प्रथमच ‘कैनोपी’ शैलीचे पिच कव्हर

भारतात प्रथमच ‘कैनोपी’ शैलीचे पिच कव्हर

बेंगळुरू : भारतातील क्रिकेट स्टेडियममध्ये असलेली ड्रेनेज प्रणाली नेहमी टीकेचे लक्ष्य ठरली आहे. त्यात ईडन गार्डन्स सर्वांत अधिक निशाण्यावर असते, पण कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने ‘कैनोपी’ शैलीचे पिच कव्हर तयार केले आहे. त्यामुळे गेले दिवस पाऊस असतानाही चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी सुरक्षित आहे.
भारतात साधारणपणे तीन आवरण असलेल्या कव्हरचा वापर करण्यात येतो. त्यात पहिले आवरण जाड्या कापडाचे असते त्यावर जाडे पॉलिथिन लावण्यात येते. त्यामुळे पावसापासून खेळपट्टीचा बचाव करता येतो. पण, खेळपट्टीचा बचाव करण्यासाठी भारतात प्रथमच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये वेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
खेळपट्टीवर दोन्ही बाजूला १२ पोल (प्रत्येक बाजूला ६) आणि कैनोपी किंवा किंवा बाजूला करता येईल अशा छतासारखे घर तयार करण्यासाठी जाड्या फायबर शिटचा वापर करण्यात आला. त्यामुळे खेळपट्टीचा पावसापासून बचाव करता आला. केसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माजी भारतीय फलंदाज व केसीएचे सचिव बृजेश पटेल यांनी या प्रकारचे कव्हर तयार केले आहे.
पारंपरिक कव्हरचा वापर केला तर पावसाचे पाणी खेळपट्टीवर जाण्याची शक्यता असते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये सूर्यप्रकाश विशेष दिसला नाही. त्यामुळे भारतीय संघाला अनुकूल खळपट्टी मिळण्याची शक्यता कमी आहे. फिरकीला अनुकू ल खेळपट्टी तयार करण्यासाठी मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीवर पाण्याचा वापर बंद केल्यानंतर किमान तीन-चार दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्यप्रकाशामुळे खेळपट्टी कोरडी होते आणि त्यावरील भेगा दिसून येतात. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Canopy' style pitch cover for the first time in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.