डावाची सुरुवात करू शकतो

By Admin | Updated: April 2, 2017 02:12 IST2017-04-02T02:12:18+5:302017-04-02T02:12:18+5:30

दुखापग्रस्त कर्णधार विराट कोहली व के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीत ख्रिस गेलच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातर्फे सलामीला खेळू शकतो

Can start the innings | डावाची सुरुवात करू शकतो

डावाची सुरुवात करू शकतो

बंगळुरू : दुखापग्रस्त कर्णधार विराट कोहली व के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीत ख्रिस गेलच्या साथीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातर्फे सलामीला खेळू शकतो, असे संकेत आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनने दिले आहेत.
आरसीबीच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वॉटसन म्हणाला, ‘विराट व राहुलच्या अनुपस्थितीत मला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. या स्थानावर मी नेहमीच फलंदाजीचा आनंद घेतला आहे आणि कारकिर्दीतीत डावाची सुरुवात करताना माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दरम्यान, मला कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तरी आनंदच होईल.’ राहुलच्या खांद्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे, तर कोहलीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध रांची कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Can start the innings