मॅक्सिको समोर कॅमरूनची अडचण
By Admin | Updated: June 13, 2014 04:37 IST2014-06-13T04:37:36+5:302014-06-13T04:37:36+5:30
आत्मविश्वास उंचावलेल्या मॅक्सिको संघाला विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’गटात शुक्रवारी कॅमरून संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे

मॅक्सिको समोर कॅमरूनची अडचण
नटाल : आत्मविश्वास उंचावलेल्या मॅक्सिको संघाला विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’गटात शुक्रवारी कॅमरून संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मॅक्सिको संघ जवळजवळ ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास उत्सुक असून, त्यासाठी मॅक्सिको संघ विजयाने सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहे.
प्रशिक्षक मिगुएल हेरारा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाला गेल्या काही विश्वकप स्पर्धांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हेरारा यांना १९९४मध्ये अमेरिकेच्या यजमानपदाखाली झालेल्या विश्वकप स्पर्धेत खेळता आले नव्हते.
एका छायाचित्रकाराला ठोसा लगाविल्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले होते. गेल्या पाच विश्वकप स्पर्धांत मॅक्सिको संघाला उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरता आलेले नाही. मॅक्सिको संघाला १९८६मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम जर्मनीविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-१ने पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)