कोलकाताने चाखली विजयाची ‘बर्फी’ !

By Admin | Updated: October 13, 2014 06:24 IST2014-10-13T06:24:14+5:302014-10-13T06:24:14+5:30

अ‍ॅटलेटिका डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या या पहिल्याच लढतीतील हाफ टाईममध्ये यजमान कोलकाताने १-० अशी आघाडी घेतली.

Calcutta Chakli wins 'Barfi'! | कोलकाताने चाखली विजयाची ‘बर्फी’ !

कोलकाताने चाखली विजयाची ‘बर्फी’ !

कोलकाता : इंग्लिश प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग, ला लीग, युरो लीग या आंतरराष्ट्रीय स्थरावरील क्लब स्पर्धांमध्ये भारताचा ठसा उमटवण्यासाठी सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत थरार अनुभवायला मिळाला. प्रीन्स आॅफ कोलकाता सौरव गांगुलीच्या यजमान अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने अप्रतिम सांघिक खेळ करून विजयाची ‘बर्फी’ चाखली. रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफसीच्या ढिसाळ बचावाचा फायदा उचलत फिकरू टेफेरा, फर्नांडिस व अरनाल लिबर्ट यांनी गोल करून कोलकाताला ३-० असा विजय मिळवून दिला.
अ‍ॅटलेटिका डी कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या या पहिल्याच लढतीतील हाफ टाईममध्ये यजमान कोलकाताने १-० अशी आघाडी घेतली. ७० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या लढतीत सुरुवातीपासून मुंबईने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. १९व्या मिनिटाला मुंबईच्या राजू गायकवाड आणि कोलकाताच्या एफ टेरेफा याला २५व्या मिनिटाला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. गोल करण्याच्या दोन संधी हुकल्यानंतर २७व्या मिनिटाला कोलकाता वासिंना जल्लोषाची संधी मिळाली. फिकरू टेरेफाने मिळालेल्या पासचा अचूक अंदाज बांधून कोलकातासाठी पहिला गोल केला. यावेळी मात्र मुंबईचा गोलकीपर पॉल याने पुढे येऊन गोल अडविण्याचा केलेला प्रयत्न फसला. २९ व ३२ व्या मिनिटाला अनुक्रमे जॅन स्टोहांज व ओफेत्सें नाटो या मुंबईच्या दोघांना यलो कार्ड दाखविण्यात आले. पहिल्या हाफमध्ये कोलकाताकडे १-० अशी आघाडी होती.
दुसऱ्या हाफमध्ये नव्या रणनितीने मैदानावर मुंंबई संघ उतरला. टिएगो रिबेरो याला बाहेर करून अ‍ॅण्ड्रे मोरिज्झ याला मैदानावर आणून मुंबईने आक्रमण वाढवला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुंबईच्या खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता. त्याचाच फायदा उचलून कोलकाताने ६९व्या मिनिटाला संधी साधली. बोर्जा फर्नांडिस याला मुंबईचा ढिसाळ बचाव फोडण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही आणि त्याने २५ यार्डावरून कोलकातासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर मुंबईची हवाच निघाली आणि संपूर्ण सामन्यात यजमानांचेच वर्चस्व दिसले. ८७व्या मिनिटाला लुइस गार्सिया याला रिप्लेस करून अरनाल लिबर्ट याला मैदानावर उतरवले. अतिरिक्त वेळेत याच अरनालने कोलकातासाठी तिसरा गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

Web Title: Calcutta Chakli wins 'Barfi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.