राज्य टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकला कांस्य
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:29+5:302014-11-21T22:38:29+5:30
नाशिक : पुणे येथे झालेल्या ४५ व्या आंतरजिल्हा व ७६ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक प्रकारात नाशिकच्या कॅडेट मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले़

राज्य टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकला कांस्य
न शिक : पुणे येथे झालेल्या ४५ व्या आंतरजिल्हा व ७६ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक प्रकारात नाशिकच्या कॅडेट मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले़ कॅडेट मुलांच्या साखळी सामन्यात नाशिकच्या संघाने अकोला संघाचा ३-० ने पराभव केला होता़ दुसर्या सामन्यात नांदेडचा ३ -० ने सहज पराभव करत संघाने बाद फेरीत प्रवेश केला होता़ परंतु उपांत्य फेरीत उत्कंठावर्धक झालेल्या पुणेविरुद्धच्या सामन्यात संघाला १-३ ने पराभव स्वीकारावा लागला़ यामुळे संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़ या सामन्यात नाशिकच्या यश पवारने पुण्याच्या अरब चौधरीचा १२-१०, ११-७, ११-८ असा सहज पराभव करत नाशिकला आघाडी मिळवून दिली होती; परंतु दुसर्या सामन्यात पुण्याच्या करण कुकरेजाने स्वराज कुलकर्णीचा सहज पराभव करत बरोबरी साधली़ दुहेरीमध्ये नाशिकच्या यश पवार व सलील गायधनीला पुण्याच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला़ परतीच्या एकेरीत नाशिकच्या यश पवारला आपली लय टिकवता न आल्याने करण कुकरेजाकडून ३-११, ६-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला़ त्यामुळे नाशिकच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नाशिकच्या संघामध्ये यश पवार, स्वराज कुलकर्णी, सलील गायधनी यांचा समावेश होता़ फोटो क्रमांक - फोटो ओळी - राज्य टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक कांस्यपदक मिळवणारा नाश्किचा कॅडेट गटाचा संघ़ समवेत डावीकडून हर्षल पवार, संजय मोडक, शेखर भंडारी, नरेंद्र छाजेड आदि़