सिंधूचे कास्यपदक पक्के
By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:33+5:302014-08-29T23:33:33+5:30
विश्व चॅम्पियनशिप : सायनाचे आव्हान संपुष्टात

सिंधूचे कास्यपदक पक्के
व श्व चॅम्पियनशिप : सायनाचे आव्हान संपुष्टातकोपनहेगेन : भारताची नवीन युवा बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिने आज येथे विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचताना सलग दुसर्यांदा आपले कास्यपदक पक्के केले आहे; परंतु स्टार शटलर सायना नेहवाल हिचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.चीनमध्ये २0१३ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकणार्या १९ वर्षीय सिंधूने पुन्हा एकदा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना चीनच्या ऑल इंग्लंड चॅम्पियन शिझियान वांग हिचे आव्हान १९-२१, २१-१९, २१-१५ असे मोडीत काढले. याच महिन्याच्या सुरुवातीला सिंधूने ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही कास्यपदक जिंकले होते. त्याआधी ऑलिम्पिक कास्यपदक आणि सातव्या मानांकित सायनाला जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चीनच्या शुएरुई हिच्याकडून अवघ्या ४५ मिनिटांत १५-२१, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले; परंतु ११ व्या मानांकित सिंधूने पुन्हा आपण भारताचे सवार्ेत्तम बॅडमिंटनपटू आहोत हे सिद्ध केले. तिने चुरशीच्या लढतीत निर्णायक क्षणी धीरोदात्त राहताना वाँगविरुद्ध चौथा विजय मिळवला. सिंधू उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या झू यिंग ताई आणि स्पेनच्या कारोलिन मारिन यांच्यातील विजयी खेळाडूशी दोन हात करील.एक तास २५ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधू आणि वांग यांनी एकमेकांच्या चुकांचा फायदा घेताना गुण मिळवले. सुरुवातीला सिंधूने नेटवर वर्चस्व राखले आणि तिने ११-५ अशी आघाडी घेतली. तथापि, वाँगनेही लवकरच स्कोअर १५-१५ असा बरोबरीत केला आणि पुन्हा पहिला गेम जिंकताना १-0 अशी आघाडी घेतली.पहिलाच गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसर्या गेममध्ये ५-१ अशी आघाडी घेतली; परंतु वांगने लवकरच ६-६ अशी बरोबरी साधली. एक वेळ चिनी खेळाडू ११-९ अशी आघाडीवर होती.वांगच्या दोन चुकांमुळे सिंधूने दोघांतील अंतर कमी केले. त्यानंतर सिंधूने १६-१६ अशी बरोबरी साधत व वांगने नेटवर केलेल्या चुकांमुळे १९-१६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर चीनच्या खेळाडूने तीन गेम पॉइंट वाचवले; परंतु अखेर सिंधूने महत्त्वपूर्ण गुण मिळवताना सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.