भारतीय महिलांना कांस्यपदक
By Admin | Updated: May 24, 2014 04:44 IST2014-05-24T04:44:36+5:302014-05-24T04:44:36+5:30
प्रतिकूल परिस्थितीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी विजय संपादन केल्यानंतर दोन दुहेरी व तिसर्या एकेरीत जपानच्या खेळाडूंकडून पराभव

भारतीय महिलांना कांस्यपदक
नवी दिल्ली : प्रतिकूल परिस्थितीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी विजय संपादन केल्यानंतर दोन दुहेरी व तिसर्या एकेरीत जपानच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे उबेर चषक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले़ जपानने भारताला २-३ गेमने पराभूत केले़ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने भारताला सकारात्मक सुरुवात करुन दिली. तिने जगातील १२व्या क्रमाकांवर असलेल्या मिनात्सु मितानी हिचा २१-१२, २१-१३ असा ४१ व्या मिनिटांत पराभव केला. त्यानंतर पी. व्ही. सिंधू हिला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने जपानच्या सयाका तकाहिशी हिच्यावर एक तास १२ मिनिटे चाललेल्या लढतीत १९-२१, २१-१८, २६-२४ असे पराभूत केले़ दुहेरीत भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना मिसाकी मात्सुमोटो आणि अयाका ताकाहाशीने ५८ मिनिटा २१-२, २०-२२, २१-१६ असे पराभूत केले. नंतरच्या एकेरीत भारताच्या तुलसी पी. सी. ला इरीको हिरोसेकडून १४-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. २-२ अशी बरोबरी झाल्यामुळे दुसरी दुहेरी खेळावी लागली. यामध्ये सायना-सिंधूला मियूकी मायदा व रिका काकीवाकडून ३८ मिनिटात १४-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)