महिला संघाला ‘डबल ट्रॅप’मध्ये कांस्य
By Admin | Updated: September 26, 2014 04:32 IST2014-09-26T04:32:05+5:302014-09-26T04:32:05+5:30
नेमबाजीमध्ये महिला संघाने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. शगून चौधरी, श्रेयासी सिंग व वर्षा वर्मन यांचा समावेश असलेल्या संघाने नेमबाजीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली

महिला संघाला ‘डबल ट्रॅप’मध्ये कांस्य
नेमबाजीमध्ये महिला संघाने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. शगून चौधरी, श्रेयासी सिंग व वर्षा वर्मन यांचा समावेश असलेल्या संघाने नेमबाजीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. पिस्तूल व रायफल रेंजमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सहभागी झालेला स्टार नेमबाज गगन नारंगला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अन्य नेमबाजांची कामगिरीही निराशाजनक ठरली. पिस्तुल नेमबाजीमध्ये गुरप्रित सिंग, महावीर सिंग व समरेश जंग यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.