डी़ हरिकाला कांस्य
By Admin | Updated: February 26, 2017 23:42 IST2017-02-26T23:42:40+5:302017-02-26T23:42:40+5:30
विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत टायब्रेकमध्ये चीनची खेळाडू टेन झ्योंगी हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

डी़ हरिकाला कांस्य
तेहरान : भारतीय ग्रॅण्डमास्टर डी हरिका हिला आज येथे विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत टायब्रेकमध्ये चीनची खेळाडू टेन झ्योंगी हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील हे तिचे तिसरे कांस्य पदक आहे.
भारताची स्टार खेळाडू असलेल्या द्रोणवली हरिका हिने टायब्रेकमध्ये अनेक संधी गमावल्या. त्याचा परिणाम हा तिला पराभवाच्या रूपाने पाहावा लागला. अंतिम फेरीत आता झ्योंगीचा सामना युक्रेनच्या अन्ना मुजिचुक हिच्याशी होईल.
हरिकाने टायब्रेकरमध्ये पहिल्या डावात विजयाने सुरुवात केली होती. तिने फक्त १७ व्या चालीतच विजय नोंदवला. तिच्या या धडाक्याने झ्योंगी मागे पडली. मात्र, दुसऱ्या डावात हरिकाने झ्योंगी हिला पुनरामन करण्याची संधी दिली. काळ््या सोंगट्यांनी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूने दुसरा डाव ड्रॉ होण्याची स्थिती असताना चूक केली. त्यामुळे तिला पराभव स्वीकारावा लागला. दुसरा डाव जिंकल्याने दोन्ही खेळाडूंनी बरोबरी साधली.
त्यानंतर बिल्ट्स गेममध्ये झ्योंगीने हरिकाला ५ -४ ने पराभूत केले. हरिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे. तिने २०१२ आणि २०१५मध्ये कांस्य पदकाची कमाई केली. (वृत्तसंस्था)
>आधीसुद्धा पराभूत
हरिका २०१२ मध्ये बल्गेरियाच्या अँटोनोटेवा स्टेफेनोवाकडून उपांत्य फेरीत पराभूत झाली होती, तर २०१५ मध्येही तिला त्या वेळची विजेती युक्रेनची खेळाडू मारिया मुझीचुक हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. साडेचार लाख डॉलर्सचे पारितोषिक असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत झ्योंगी आणि म्युझिचुक लढतील. दुसऱ्या उपांत्य लढतीत युक्रेनच्या अॅना म्युझीचुक हने रशियाच्या अलेक्स्झांड्रा कोस्टेनियुक हिचा पराभव केला.स्पर्धेतून बाहेर पडणे हे क्लेशदायक आहे. मला पदकाचा रंग बदलण्यात अपयश आले. हे तिसरे कांस्य पदक आहे
- द्रोणावली हरिका