डेव्हिस कपमध्ये ब्रिटनची बरोबरी
By Admin | Updated: November 29, 2015 00:59 IST2015-11-29T00:59:36+5:302015-11-29T00:59:36+5:30
दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि बेल्जियमचा डेव्हिड गॉफीनने आपल्या स्वतंत्र एकेरी सामन्यात विजय मिळविला आहे. त्यामुळे डेव्हिस कप अंतिम फेरीत स्कोर

डेव्हिस कपमध्ये ब्रिटनची बरोबरी
घेंट, बेल्जियम : दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि बेल्जियमचा डेव्हिड गॉफीनने आपल्या स्वतंत्र एकेरी सामन्यात विजय मिळविला आहे. त्यामुळे डेव्हिस कप अंतिम फेरीत स्कोर १ -१ असा झाला. २८ वर्षांच्या मरे याने इनडोअर क्ले कोर्टवर झालेल्या या सामन्यात १०८ रँक असलेल्या बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्स याचा ६-३, ६-२, ७-५ असा पराभव केला. त्यासोबत जागतिक पातळीवर १६ व्या क्रमांकाचा खेळाडू गॉफीन याने सुरुवातीचे दोन सेट गमाविल्यावर विजयासाठी संघर्ष केला. त्याला पाच सेटपर्यंत झालेल्या या सामन्यात काएले एडमंड याने ३-६, १-६, ६-२, ६-१, ६-० असे पराभूत केले.
एडमंड याने पहिला सेट १२ मिनिटांत, तर दुसरा सेट २५ मिनिटांत आपल्या नावे केला. या सामन्यात सुरुवातीला एडमंड याने पूर्ण नियंत्रण ठेवले होते; मात्र तिसऱ्या सेटमध्ये गॉफीन याने १३ हजार दर्शकांच्या उपस्थितीत शानदार पुनरागमन केले. त्याने सलग तीन सेटमध्ये विजय मिळवीत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली होती.
दुसऱ्या सामन्यात अँडी मरेला फारशा अडचणींचा सामना करावा लागला नाही. त्याने सुरुवातीचे दोन सेट सहज जिंकले. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला मरे काहीसा पिछाडीवर पडला; मात्र आपल्या फोरहँड शॉटमुळे सामना आपल्या नावे केले.
ब्रिटनने १९३६ नंतर कधीही डेव्हिस कप जिंकलेला नाही.
मरेनेच १९३६ नंतर ब्रिटनसाठी विम्बल्डन ग्रँडस्लॅम जिंकलेला आहे. शेवटी ब्रिटनसाठी फ्रेड पेरी याने हा विजय मिळविला होता. बेल्जियमनेही डेव्हिस कपच्या ११५ वर्षांच्या इतिहासात एकदाही किताब जिंकलेला नाही.