ब्रेथवेट, सॅम्युअल्सच्या शतकाने आफ्रिकेच्या स्वप्नावर ‘पाणी’
By Admin | Updated: December 29, 2014 23:54 IST2014-12-29T23:54:18+5:302014-12-29T23:54:18+5:30
क्रेग ब्रेथवेट (१०६) आणि मर्लोन सॅम्युअल्स (१०१) यांच्या शतकानंतरही विंडीजने ४४ धावांत ७ गडी गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची विजयाची आशा नंतर पावसामुळे धुळीस मिळाली़

ब्रेथवेट, सॅम्युअल्सच्या शतकाने आफ्रिकेच्या स्वप्नावर ‘पाणी’
एलिझाबेथ : क्रेग ब्रेथवेट (१०६) आणि मर्लोन सॅम्युअल्स (१०१) यांच्या शतकानंतरही विंडीजने ४४ धावांत ७ गडी गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची विजयाची आशा नंतर पावसामुळे धुळीस मिळाली़
वेस्ट इंडीजने दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारल्यामुळे ही कसोटी बरोबरीत सुटेल हे निश्चित झाले आहे़ पावसामुळे चौथ्या दिवशी केवळ ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला़ विंडीज अद्यापही आफ्रिकेच्या स्कोअरपासून १४२ धावांनी पिछाडीवर आहे़ आफ्रिकेने आपला पहिला डाव ८ बाद ४१७ धावांवर घोषित केला होता़
ब्रेथवेट आणि सॅम्युअल्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७६ धावांची भागीदारी रचली़ एकवेळ विंडीज संघ २ बाद २३१ अशा मजबूत स्थितीत होता़ मात्र, नंतर ४४ धावांत त्यांनी ७ गडी गमावले़ त्यामुळे त्यांची स्थिती ९ बाद २७५ अशी झाली़ आफ्रिकेच्या मार्ने मोर्केलने ४, तर इम्रान ताहिरने ३ बळी मिळविले़ वेर्नान फिलँडरने १ गडी बाद केला़ (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
आफ्रिका पहिला डाव : ८ बाद ४१७़ विंडीज पहिला डाव : ७९ षटकांत ९ बाद २७५़ (क्रेग ब्रेथवेट १०६, मार्लोन सॅम्युअल्स १०१, डी़ स्मिथ २२, दिनेश रामदीन २०, जेरोम टेलर नाबाद १०़ मोर्ने मोर्केल ४/६९, इमरान ताहिर ३/१०८)़