ब्राझिलची विजयी सलामी
By Admin | Updated: June 13, 2014 10:56 IST2014-06-13T05:53:40+5:302014-06-13T10:56:21+5:30
फिफा वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणा-या ब्राझीलने पहिल्याच सामन्यात क्रोएशियाचा ३-१ ने पराभव करत विजयी सलामी दिली.

ब्राझिलची विजयी सलामी
ऑनलाइन टीम
साओ पोलो, दि. १२ - फिफा वर्ल्डकप २०१४ च्या पहिल्याच सामन्यात यजमान ब्राझीलने क्रोएशियाचा ३-१ ने पराभव करत विजयी सलामी दिली. वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणा-या ब्राझीलमध्ये ६८ हजार फूटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत अरेना कोरिन्थियान्स स्टेडियमवर उद्घाटन सोहळा धडाक्यात पार पडला. त्यानंतर क्रोएशियाविरुद्ध सुरू झालेल्या सामन्यात फर्स्ट हाफमधील खेळ चुरशीचा होता. मात्र सेंकड हाफमध्ये ब्राझीलच्या खेळाडूंनी शआनदार खेल करत ३-१ असा विजय मिळवला.
क्रोएशियाच्या ओलिसने पहिला गोल करण्याच्या प्रयत्नात ब्राझीलच्या गोलसमोर उभ्या असलेल्या जेलाविचला बॉल पास केला त्याने किक केल्यावर बॉल ब्राझीलचा खेळाडू मार्सेलो आणि गोल किपर सीजर यांना हुलकावणी देत गोल बॉक्समध्ये गेला आणि पहिला गोल करण्यात क्रोएशियाचा संघ यशस्वी झाला. त्यानंतर ब्राझीलच्या ऑस्कर आणि नेमारने खेळ मनावर घेत अत्यंत जिकरीने गोल केले. त्यांचा खेळ रोखण्यात क्रोएशइयाचा गोल किपर प्लेतिकोस यशस्वी झाला नाही. पॅनल्टीमुळ संधी मिळताच नेमारने सर्व डिफेंडर हुलकावत गोल केला. क्रोएशियाच्या खेळाडूला पाडल्यामुळे नेमारला पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते. यानंतरही त्याच्या उत्साहात कमी जाणवली नाही. खेळाच्या २९ व्या मिनीटाला त्याने ऑस्कर कडून मिळालेल्या पासींगवर गोल केला.