मेक्सिकोविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

By Admin | Updated: June 17, 2014 04:11 IST2014-06-17T04:11:39+5:302014-06-17T04:11:39+5:30

विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि यजमान ब्राझील मंगळवारी येथे अ गटातील दुसऱ्या लढतीत मेक्सिकोविरुद्ध आपला स्टार फुटबॉलपटू नेमारच्या बळावर पुन्हा एकदा विजयी मालिका कायम ठेवण्यास आतुर असेल.

Brazil's Parade heavy against Mexico | मेक्सिकोविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

मेक्सिकोविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

साऊ पाउलो : विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि यजमान ब्राझील मंगळवारी येथे अ गटातील दुसऱ्या लढतीत मेक्सिकोविरुद्ध आपला स्टार फुटबॉलपटू नेमारच्या बळावर पुन्हा एकदा विजयी मालिका कायम ठेवण्यास आतुर असेल.
ब्राझीलने विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत क्रोएशियाविरुद्ध शानदार विजयाने प्रारंभ केला होता आणि घरच्या मैदानावर व प्रेक्षकांच्या साक्षीने त्यांच्यात पुन्हा एकदा विजयासाठी विश्वास दिसून येत आहे. पहिला सामना जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या ब्राझीलचे या सामन्यात पारडे जड दिसत आहे, तर मेक्सिकोला सनसनाटी निकालाची अपेक्षा असेल. या दोन संघांत आतापर्यंत ३८ सामने झाले आहेत आणि त्यात २२ वेळेस ब्राझीलने विजय मिळवला आहे, तर १० वेळेस मेक्सिकोनेही विजयाची चव चाखली आहे.
सहा सामने ड्रॉ राहिले आहेत. विशेष म्हणजे १९ जून २०१३ ला ब्राझीलच्या फोर्टालेजात दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आमने-सामने उभे ठाकले होते आणि त्यात ब्राझीलने २-० असा विजय मिळवला होता.
ब्राझीलने ४-० असा धडाकेबाज विजय मिळवला होता. गत सप्टेंबर ते आतापर्यंत १० सामन्यांत ब्राझीलने सलग विजय मिळवले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, तसेच एक संघ म्हणूनही त्यांच्या कामगिरीचा ग्राफही चांगला उंचावत आहे.
आता ११ व्या विजयासाठी नेमार, आॅस्कर आणि थियागो सिल्वा यांच्याकडूनही त्यांना खूप अपेक्षा आहेत. ब्राझीलच्या आॅस्करने मेक्सिको संघ चांगला असल्याचे म्हटले.
तो म्हणाला, ‘‘मेक्सिकोविरुद्ध सामन्याआधी म्हटले, मेक्सिको संघ चांगला आहे आणि त्यांच्याविरुद्ध ब्राझीलला नेहमीच चांगली मेहनत घ्यावी लागली आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Brazil's Parade heavy against Mexico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.