ब्राझीलला धक्का, दुखापतीमुळे नेयमार वर्ल्डकपबाहेर
By Admin | Updated: July 5, 2014 14:29 IST2014-07-05T08:42:48+5:302014-07-05T14:29:55+5:30
मणक्याचे हाड मोडल्याने ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार वर्ल्डकपमधील उर्वरित सामने खेळू शकणार नसल्याने ब्राझीलच्या पाठीराख्यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्राझीलला धक्का, दुखापतीमुळे नेयमार वर्ल्डकपबाहेर
ऑनलाइन टीम
फोर्टेलेजा, दि. ५ - फिफा वर्ल्डकपमध्ये कोलंबियाचा २-१ असा पराभव करत ब्राझील सेमीफायनलमध्ये पोचल्याचा आनंद मानावा की दुखापतीमुळे स्टार खेळाडू नेयमार उर्वरित सामने खेळू शकणार नाही याचे दु:ख मानावे असा प्रश्न आता ब्राझीलच्या पाठीराख्यांसमोर आहे. मणक्याचे हाड मोडल्याने ब्राझीलचा वंडर बॉय नेयमार बाकीच्या सामन्यांना मुकणार आहे. यामुळे ब्राझीलला मोठा धक्का बसला आहे.
कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात झुनिगांची नेयमारला धडक बसली, त्याचा गुडगा नेयमारच्या पाठीवर लागला व तो खाली कोसळला. ही धडक इतकी जोरात होती की नेमारच्या मणक्याचे हाडच मोडले. त्यामुळे आता तो उरलेल्या सामन्यांत खेळू शकणार नाही.
दरम्यान सेमाफायनलमध्ये ब्राझील आणि जर्मनी हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. मंगळवारी ब्राझील आणि जर्मनी यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे. २००२ च्या विश्वचषकानंतर हे दोन्ही संघ प्रथमच आमने सामने आले आहेत. २००२ मधील अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीचा २-० ने पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले होते