ब्राझील ग्रांप्रीवर रोसबर्गचा ङोंडा
By Admin | Updated: November 10, 2014 23:38 IST2014-11-10T23:38:35+5:302014-11-10T23:38:35+5:30
मर्सिडीजचा आपला सहकारी चालक लुईस हॅमिल्टनच्या केवळ एका चुकीचा फायदा उठवीत निको रोसबर्ग याने ब्राझील ग्रांप्रीवर आपला ङोंडा फडकविला.

ब्राझील ग्रांप्रीवर रोसबर्गचा ङोंडा
साओ पावलो : मर्सिडीजचा आपला सहकारी चालक लुईस हॅमिल्टनच्या केवळ एका चुकीचा फायदा उठवीत निको रोसबर्ग याने ब्राझील ग्रांप्रीवर आपला ङोंडा फडकविला. या विजयाने त्याने यंदाची वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याची आशा जिवंत ठेवली आहे.
रोसबर्गने हॅमिल्टनच्या सलग पाच विजयांची शृंखला तोडत दोघांमधील अंतर 17 गुणांवर आणून ठेवले आहे. सत्रतील शेवटची शर्यत आता 23 नोव्हेंबरला आबुधाबीमध्ये होणार आहे. जर्मनीच्या रोसबर्गने ब्राझील ग्रांप्रीमध्ये सराव सत्रतही बाजी मारली होती. या सत्रत त्याने दहाव्यांदा पोल पोजीशन जिंकली होती. रोसबर्गला मागे टाकण्याची संधी हॅमिल्टनला 29 व्या लॅपमध्ये मिळाली होती, परंतु त्याने ती गमावली. हॅमिल्टन आपली चूक मान्य करताना म्हणाला, मी शर्यतीच्या मध्यावर मोठी चूक केली.
फोर्स इंडिया सहाव्या स्थानावर
साओ पावलो : या वर्षीच्या चॅम्पियनशीपमध्ये सहारा फोर्स
इंडिया टिम सहाव्या स्थानावर
राहीली. निको हुल्केनबर्ग ब्राझील ग्रा प्रीमध्ये आठव्या स्थानावर राहीला. सर्जियो पेरेज एकही गुण मिळवू
शकला नाही.
हुल्केनबर्ग आठव्या तर पेरेज 15 व्या स्थानावर राहीला. फोर्स इंडिया 127 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आता आबुधाबीत होणा:या शर्यतीत कितीही गुण मिळाले तरी भारताच्या क्रमांकात बदल होणार नाही. हुल्केनबर्ग म्हणाला, ही चांगली शर्यत झाली. आठव्या क्रमांकावर आल्याने समाधान आहे. तीन स्टॉपवाली शर्यत नेहमीच आव्हानात्मक असते. परंतु मला जास्त त्रस झाला नाही.