ब्राझील-क्रोएशिया सलामी

By Admin | Updated: June 12, 2014 04:42 IST2014-06-12T04:42:28+5:302014-06-12T04:42:28+5:30

फुटबॉलला धर्म आणि फुटबॉलपटूंना देव समजणाऱ्या ब्राझीलमध्ये वर्ल्डकपला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.

Brazil-Croatia salute | ब्राझील-क्रोएशिया सलामी

ब्राझील-क्रोएशिया सलामी

साओ पाउलो (ब्राझील) : फुटबॉलला धर्म आणि फुटबॉलपटूंना देव समजणाऱ्या ब्राझीलमध्ये वर्ल्डकपला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. क्रोएशियाबरोबर होणाऱ्या सलामीच्या लढतीत या भक्तांना नाराज न करण्याचा अपेक्षांचा ‘पहाड’ यजमानांवर असणार आहे. या अपेक्षांना पुरुन उरणारी कामगिरी ब्राझील संघाला करावी लागणार आहेत.
आकडेवारीवर नजर टाकली तर ब्राझीलचे पारडे सरस ठरते, म्हणूनच पहिल्या क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे.
स्कोलारीपुढे दुखापतीसारख्या कोणत्याही समस्या नाहीत. त्यामुळे एखादा आश्चर्यजनक निर्णय सोडल्यास कॉन्फेडरेशन चषकात स्पेनला हरविणाऱ्या संघात ते फारसा बदल करतील, असे वाटत नाही.
गेल्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत ज्याच्या चुकीमुळे ब्राझीलला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले तो जुलियो सीजर यावेळीही गोलरक्षकाच्या भूमिकेत असणार आहे.
तिएगो सिल्वा आणि डेव्हीड लुईज बचावफळीची जबाबदारी पेलतील. जादुई स्ट्रायकर नेयमार व हल सेंटर फॉरवर्ड फ्रेडसोबत समन्वयाचे काम करतील. दुसरीकडे क्रोएशियाला आपल्या अव्वल खेळाडूंची कमतरता जाणवेल.
सेंटर बॅक सिमोनिचवर अगोदरच बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी क्रोएशियाला अद्भुत खेळ करावा लागेल आणि तो चमत्कारच ठरेल.
(वृत्तसंस्था)

Web Title: Brazil-Croatia salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.