आॅकलंड : उत्कृष्ट नेतृत्व आणि शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम याला न्यूझीलंडचा सर्वोच्च क्रिकेट पुरस्कार ‘रिचर्ड हॅडली पदक’ देऊन गौरविण्यात आले. ३३ वर्षीय मॅक्युलमने आपल्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच संघाला विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठून दिली. अंतिम सामन्यातील पराभवानंतरही या संघाने स्पर्धेतील आपल्या शानदार कामगिरीने अनेकांची मने जिंकली.त्याची आयसीसी संघाच्या कर्णधारपदी देखील निवड करण्यात आली. विशेष म्हणजे केन विलियम्सन आणि टे्रंट बोल्ट या अन्य विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या संघ सहकाऱ्यांना मागे टाकून मॅक्युलमने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला. त्याच वेळी विलियम्सनला प्रथम श्रेणी फलंदाजीकरिता रेडपाथ कप आणि गोलंदाजीतील चमकदार कामगिरीमुळे बोल्टला विंसर कप देऊन गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)
ब्रँडन मॅक्युलमला रिचर्ड हॅडली पुरस्कार
By admin | Updated: April 3, 2015 00:28 IST