ब्रॅडमनने दिली होती अमूल्य भेट

By Admin | Updated: September 5, 2014 02:12 IST2014-09-05T02:12:52+5:302014-09-05T02:12:52+5:30

सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच एक विशेष नाते राहिलेले आहे. या महान भारतीय खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच पाठिंबा मिळाला होता.

Bradman had a great gift | ब्रॅडमनने दिली होती अमूल्य भेट

ब्रॅडमनने दिली होती अमूल्य भेट

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच एक विशेष नाते राहिलेले आहे. या महान भारतीय खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच पाठिंबा मिळाला होता. ऑस्ट्रेलियन तेंडुलकरला आपलेच मानत आले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रेट ली आणि अॅडम गिलािस्ट यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी ऑस्ट्रेलियन दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा बंध आणखी घट्ट झाला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताच्या दोन दिवसांच्या दौ:यावर आले आहेत. यानिमित्त दूतावासाने ‘क्रिकेट डिप्लोमसी’ अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमानंतर लगेचच आयोजित पत्रकार परिषदेत सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या भेटीवेळच्या आठवणींना उजाळा दिला. सर डॉन ब्रॅडमन यांनी सर्वकालीन कसोटी संघ निवडला होता त्याचा फोटो आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले. ब्रॅडमन यांनी तेंडुलकर याला त्यांच्या संघात स्थान दिले होते, ही आपल्यासाठी कायमस्वरूपी अमूल्य भेट असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. तेंडुलकर म्हणाला, ‘सर ब्रॅडमन यांनी 1994-95 मध्ये त्यांच्या पत्नीजवळ म्हटले होते की, त्यांची आणि माझी खेळण्याची शैली एकसारखीच आहे. त्यांच्यासारख्या महान खेळाडूने केलेली स्तुती ही माङयासाठी अमूल्य भेट आहे. त्याचबरोबर मला त्यांनी आपल्या संघात स्थान देणो ही त्याहून मोठी गोष्ट होती.’
त्याचबरोबर 2क्क्8 मध्ये सर ब्रॅडमनची बॅट हातात घेतली होती, तेव्हाच्या आठवणींनाही सचिनने उजाळा दिला. तो म्हणाला, ‘मी सिडनीमध्ये सर ब्रॅडमन यांची बॅट घेऊन खेळलो. मी खूप काळजी घेतली होती; मात्र ती गोष्टच खूप विशेष होती. सर डॉन यांनी 3क् वर्षापूर्वी वापरलेली बॅट घेऊन खेळणो हे खूपच रोमहर्षक होते.’
सचिन तेंडुलकरने यावेळी भारताला 2क्15 मध्ये होणा:या विश्वचषक स्पर्धेसाठीही शुभेच्छा दिल्या. ‘ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये आम्ही 1991-92 मध्ये खेळलो होतो. त्याच्या काही चांगल्या आठवणी आहेत. भारत आपले विश्वविजेतेपद राखण्यास सज्ज असल्याचा इशाराही त्याने यावेळी अन्य संघांना दिला.
तेंडुलकरने युवा खेळाडूंनाही यावेळी सल्ला दिला. तो म्हणाला, ‘मैदानावर असताना खिलाडूवृत्तीनेच वागले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पध्र्याचाही आदर करायला शिकायला हवे. खेळ आपल्याला खूप काही शिकवतो. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. जे तुम्ही खेळाच्या मैदानात शिकता ते कोणत्याही शाळेच्या वर्गात शिकता येत नाही, असे सांगून तेंडुलकर म्हणाला, ‘मी जेव्हा पराभवाचा सामना केला तेव्हा एकच शिकवण घेतली की, खिलाडूवृत्तीनेच हा खेळ पुन्हा खेळला पाहिजे.’ (विशेष प्रतिनिधी)
 
ब्रेट ली बनणार बॉलिवूड अभिनेता
च्ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी ब्रेट ली लवकरच एका चित्रपटात दिसणार असल्याची माहिती दिली. तनिश्ता चॅटर्जी हिच्यासमवेत ‘अनइंडियन’ या चित्रपटाद्वारे बेट्र ली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट इंडो-ऑस्ट्रेलियनच्या सहकार्यातून बनणार आहे.
च्नुकत्याच एका चित्रपटात तनिश्ताने एका विधवा महिलेची भूमिका केली होती, जी ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी संघर्ष करीत होती. 
च्हा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या सहकार्याने बनणारा पहिला चित्रपट आहे. मागील वर्षी भारतीय कल्पनेवर बनणा:या ऑस्ट्रेलियन चित्रपटासाठी खास निधी उभारण्यात आला आहे.
च्बेट्र ली यापूर्वी हरमन बावजा याच्या ‘व्हिक्टरी’ या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसला होता.

 

Web Title: Bradman had a great gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.