बीपीसीएल-वेस्टर्न रेल्वेची चिवट

By Admin | Updated: October 6, 2015 23:54 IST2015-10-06T00:21:23+5:302015-10-06T23:54:36+5:30

झुंज

BPCL-Western Railway | बीपीसीएल-वेस्टर्न रेल्वेची चिवट

बीपीसीएल-वेस्टर्न रेल्वेची चिवट

झुंज

महिला गटात वेस्टर्न रेल्वे संघ, महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजयी
-राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा


फोटो आहे.
फाईल
०५१०२०१५-आरटीएन-०१
०५१०२०१५-आरटीएन-०२
कॅप्शन
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात वेस्टर्न रेल्वे संघाने तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले.

खालगाव : बळीराम परकर विद्यालयाच्या कै. प्रभावती मधुकर खेऊर क्रीडानगरीत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत पुरुष गटात वेस्टर्न रेल्वे संघाने तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले. भारत पेट्रोलियम संघाने (बीपीसीएल) विरुध्द वेस्टर्न रेल्वे संघात चांगलीच लढत झाली. दोन्ही संघाचे सारखेच गुण राहिल्याने अखेर पाच एन्ट्रीची संधी देण्यात आली. यामध्ये वेस्टर्न रेल्वे संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्याहस्ते गौरवण्यात आले.
या स्पर्धेचा सांगता समारंभ रविवारी रात्री पार पडला. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचा अंतिम सामना बलाढ्य भारत पेट्रोलियम, मुंबई विरुद्ध वेस्टर्न रेल्वे, मुंबई या दोन संघामध्ये झाला. त्यामध्ये वेस्टर्न रेल्वे संघाने चिवट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत प्रो. कबड्डीतील नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या भारत पेट्रोलियम संघावर मात करीत स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.
महिला गटातील सामना शिवशक्ती मंुबई विरुद्ध राजमाता जिजाऊ पुणे यांच्यात झाला. यामध्ये पुणे महिला संघाच्या खेळाडूने आकर्षक खेळाचे प्रदर्शन करीत हा संघ अंतिम विजेता ठरला. यातील अंतिम विजेत्या पुरुष गटातील वेस्टर्न रेल्वे संघाला रोख रु. ७५ हजार व भव्य चषक तर उपविजेत्या भारत पेट्रोलियम संघाला ५१ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
महिला संघातील अंतिम विजेत्या पुणे राजमाता जिजाऊ संघाला रु. ५५ हजार व चषक तर उपविजेत्या शिवशक्ती मुंबई कबड्डी संघाला रोख ३१ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
तसेच वैयक्तीक बक्षिसाचे मानकरी पुरुष गटात उत्कृ ष्ट पकड - बी. रमेश (वेस्टर्न रेल्वे), उत्कृ ष्ट चढाई - रिशांक देवाडिका, उत्कृ ष्ट खेळाडू सुनील जयपाल तर महिलांमधून उत्कृष्ट पकड सायली किरवाळे (राजमाता पुणे), उत्कृ ष्ट चढाई अपेक्षा टाकले (शिवशक्ती, मुंबई), उत्कृ ष्ट खेळाडू स्नेहल शिंदे (राजमाता पुणे) यांनाही गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, बाबाजी जाधव, शेखर निकम, उमेश शेट्ये, प्रकाश साळवी, शरद बोरकर, नाना मयेकर, मुख्याध्यापक विनायक राऊत उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: BPCL-Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.