बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिप आजपासून
By Admin | Updated: October 6, 2015 01:11 IST2015-10-06T01:11:33+5:302015-10-06T01:11:33+5:30
प्रतिकूल परिस्थितीमध्येही कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेले भारतीय बॉक्सर्स मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्यासह आॅलिम्पिक

बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिप आजपासून
दोहा : प्रतिकूल परिस्थितीमध्येही कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेले भारतीय बॉक्सर्स मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्यासह आॅलिम्पिक कोटा निश्चित करण्यास उत्सुक आहेत.
राष्ट्रीय महासंघाच्या निलंबनामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) ध्वजाखाली खेळणाऱ्या भारतीय बॉक्सर्सनी वेळोवेळी चमक दाखवीत चांगले निकाल देण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या बँकॉक आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत सहा बॉक्सर्सनी विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्थान निश्चित केले. यापूर्वी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबख्शसिंग संधू म्हणाले, ‘सर्व बॉक्सर्सचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये खडतर आव्हान राहणार आहे; पण आम्ही कसून मेहनत घेतली आहे. या खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीतही चांगले निकाल दिलेले आहेत. विश्व चॅम्पियनशिपमध्येही त्याचीच पुनरावृत्ती होईल.’ विश्व चॅम्पियनशिपमध्ये १० वजन गटात आॅलिम्पिकसाठी २३ कोटा स्थान निश्चित होणार असून, त्यासाठी ७३ देशांचे २६० बॉक्सर्स रिंगणात उतरणार आहेत. भारतीय चाहत्यांची नजर विकास, शिवा, देवेंद्रो आणि मनोज यांच्या कामगिरीवर आहे. (वृत्तसंस्था)
एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), मदन लाल (५२ किलो,) शिव थापा (५६ किलो), मनोज कुमार (६४ किलो), विकास कृष्णन (७५ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक) विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत आहेत.