बॉक्सिंग इंडियाचा ‘नवोदय’ होणार

By Admin | Updated: September 11, 2014 01:48 IST2014-09-11T01:48:11+5:302014-09-11T01:48:11+5:30

राष्ट्रीय महासंघावर बंदी असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाचक्कीचा सामना करीत असलेल्या भारतीय बॉक्सिंगचा उद्या गुरुवारी ‘नवोदय’होण्याची चिन्हे आहेत.

Boxing India's 'Navodaya' will be done | बॉक्सिंग इंडियाचा ‘नवोदय’ होणार

बॉक्सिंग इंडियाचा ‘नवोदय’ होणार

मुंबई : राष्ट्रीय महासंघावर बंदी असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाचक्कीचा सामना करीत असलेल्या भारतीय बॉक्सिंगचा उद्या गुरुवारी ‘नवोदय’होण्याची चिन्हे आहेत. या खेळाचे संचालन करणाऱ्या बॉक्सिंग इंडियाची निवडणूक होत आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेद्वारा (आयबा) मान्यताप्राप्त बॉक्सिंग इंडिया निवडणुकीचे आयोजन करीत आहे, पण त्याआधीच निवडणुकीत अफरातफर होत असल्याचा आरोपही झाला. निवडणूक आटोपल्यानंतर जे पदाधिकारी काम पाहतील त्यांच्या गटाला बॉक्सिंग इंडिया म्हणून ओळखले जाईल. आधी ही संघटना भारतीय अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघ (आयएबीएफ) या नावे ओळखली जायची. या संघटनेवर डिसेंबर २०१२ पासून निलंबनाची तलवार लटकत राहिली तसेच यंदा सुरुवातीला बरखास्त करण्यात आले. आयबाचे पर्यवेक्षक कायदे व्यवस्थापक क्लायडोन गाई आणि विश्व संस्थेत भारताचे प्रतिनिधी असलेले किशन नर्सी हे संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतील. दोघेही आपला अहवाल सादर करणार असून त्यानंतरच बॉक्सिंग इंडियाला अधिकृत मानले जाईल. मतदानात कुठलीही कसर शिल्लक राहू नये यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओचित्रण होणार आहे.
बॉक्सिंग इंडियाचे सदस्य उदित सेठ म्हणाले, ‘पारदर्शीपणा राखण्यासाठी जे जे उपाय असतील ते सर्व केले जातील.’ बॉक्सिंग इंडिया हा माजी प्रशासक आणि कॉर्पोरेट समूहाचा गट आहे. यात बॉक्सिंगला दीर्घकाळपासून राजाश्रय देणारे संदीप जाजोदिया यांचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी कुणी दुसरा उमेदवार नसल्याने जाजोदिया हे
निर्विरोध अध्यक्ष बनले. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा उद्या होईल.
ही निवडणूक ९ जुलै रोजी होणार होती. पण ती टाळण्यात आली. दरम्यान अनेक राज्य संघटनांनी बॉक्सिंग इंडियाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावले. बॉक्सिंग इंडियाने क्रीडा मंत्रालय आणि आयोएला पर्यवेक्षक पाठविण्याची विनंती केली पण आयओएने विनंती फेटाळली तर मंत्रालयाने उत्तर दिले नाही. मतदान सुरळीत पार पडले आणि संपूर्ण प्रक्रिया समाधानकारक असल्याची आयबाच्या पर्यवेक्षकांची खात्री पटली तर बॉक्सिंग इंडियाला आयबाकडून अस्थायी मान्यता मिळेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Boxing India's 'Navodaya' will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.