नेमबाजांपाठोपाठ बॉक्सर्सनी गाजवले वर्चस्व
By Admin | Updated: February 13, 2016 23:32 IST2016-02-13T23:32:55+5:302016-02-13T23:32:55+5:30
नेमबाजांनंतर शनिवारी भारतीय बॉक्सर्सनी १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पदकतालिकेत भारत अन्य देशांच्या तुलनेत मोठ्या फरकाने आघाडीवर आहे.

नेमबाजांपाठोपाठ बॉक्सर्सनी गाजवले वर्चस्व
गुवाहाटी : नेमबाजांनंतर शनिवारी भारतीय बॉक्सर्सनी १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पदकतालिकेत भारत अन्य देशांच्या तुलनेत मोठ्या फरकाने आघाडीवर आहे.
भारतीय नेमबाजांनी शनिवारी सर्व सहाही सुवर्णपदके पटकावली, तर ट्रायथलॉनपटूंनी दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले. बॉक्सिंगमध्ये देवेंद्रो सिंग आणि शिव थापा यांनी अनुक्रमे भूतानच्या ताशी वांगडी व नेपाळच्या श्रेष्ठा दिनेश यांचा पराभव केला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या विकास कृष्णनने पहिल्या दिवशी छाप सोडली.
भारत २५६ पदकांसह (१५५ सुवर्ण, ८४ रौप्य व २६ कांस्य) पदकतालिकेत अव्वल स्थानी आहे. श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने १६१ पदके (२५ सुवर्ण, ५५ रौप्य, ८१ कांस्य) पटकावली आहेत, तर पाकिस्तान ७९ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
शनिवारी ८ सुवर्णपदकांचा निकाल लागला. त्यात सर्व
पदके भारताच्या वाट्याला
आली. नेमबाजीमध्ये सहा तर ट्रायथलॉनमध्ये दोन सुवर्णपदके भारताने पटकावली.