बॉक्सर सरिता देवी वादग्रस्त निर्णयाचा बळी
By Admin | Updated: October 1, 2014 02:04 IST2014-10-01T02:04:38+5:302014-10-01T02:04:38+5:30
60 किलो वजन गटातील भारताची महिला बॉक्सर एल. सरिता देवी हिला आशियाडच्या उपांत्य लढतीत जज्जने दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे मंगळवारी पराभव पत्करावा लागला.

बॉक्सर सरिता देवी वादग्रस्त निर्णयाचा बळी
>इंचियोन : 6क् किलो वजन गटातील भारताची महिला बॉक्सर एल. सरिता देवी हिला आशियाडच्या उपांत्य लढतीत जज्जने दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे मंगळवारी पराभव पत्करावा लागला. यावर भारतीय बॉक्सिंग पथकाने 5क्क् डॉलरचा भरणा करीत आक्षेप नोंदविला पण तो देखील फेटाळून लावण्यात आला.
एआयबीएच्या नियमानुसार कुठल्याही जज्जविरुद्ध आक्षेप घेता येत नाही, केवळ रेफ्रीने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आक्षेप नोंदविता येतो. सरिताने द. कोरियाची जीना पार्क हिच्याविरुद्ध सुरेख कामगिरी केल्यानंतरही तिला वादग्रस्तरीत्या पराभूत घोषित करण्यात आले. यामुळे सुवर्णाची आशा असलेल्या या खेळाडूंला कांस्यावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
या नर्णयावर मी फार निराश आहे. मला धक्काच बसला. सरिता विजेता आहे हे स्पष्टपणो दिसत होते. पण घडले उलटेच! असे घडायला नको होते.
- एम.सी. मेरिकोम
जज्जचे हे फिक्सिंग आधीच ठरले असावे. रिंकमध्ये जे घडले ते पाहून लढत आधीच रोखायला हवी होती. सरिता स्पष्टपणो विजेता होती पण येथे पैशाचा बोलबाला आहे. या जज्ज लोकांना उचलून बाहेर फेकायला हवे. या आधी 1988 साली सेऊल ऑलिम्पिकदरम्यान असेच घडले होते. आता पुनरावृत्ती झाली. काहीच बदलले नाही असे चित्र आहे. नव्या नियमांमुळे काहीच फरक पडलेला नाही.-बी.आय. फर्नाडिस,
सरिताचे कोच