बॉक्सर मनप्रीत डोपमध्ये अडकला

By Admin | Updated: October 3, 2015 00:27 IST2015-10-03T00:27:05+5:302015-10-03T00:27:05+5:30

आशियाडचा रौप्यविजेता बॉक्सर मनप्रीतसिंग(९१ किलोगट) हा नाडाच्या डोप परीक्षणात अपयशी ठरला आहे. त्याने स्वत:च्या ‘ब’ नमुन्याचा तपास करण्याची मागणी केल्याने

Boxer got trapped in Manpreet Dope | बॉक्सर मनप्रीत डोपमध्ये अडकला

बॉक्सर मनप्रीत डोपमध्ये अडकला

नवी दिल्ली : आशियाडचा रौप्यविजेता बॉक्सर मनप्रीतसिंग(९१ किलोगट) हा नाडाच्या डोप परीक्षणात अपयशी ठरला आहे. त्याने स्वत:च्या ‘ब’ नमुन्याचा तपास करण्याची मागणी केल्याने सध्या स्पर्धेत खेळण्यास पात्र राहील. सेनादल क्रीडा नियंत्रण बोर्डाचा सदस्य असलेला मनप्रीत सध्या विश्व मिलिटरी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने द. कोरियातील म्युनगियोंग येथे आहे. त्याचे अपील प्रलंबित असेपर्यंत तो स्पर्धेत खेळू शकतो. मनप्रीत सेना क्रीडा अकादमीत सराव करतो. तेथील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तो नाडाच्या डोप चाचणीत अपयशी ठरला.अलीकडे तो आजारी पडला. यादरम्यान त्याने खोकल्याचे औषध सेवन केल्याचे कळते. नाडाने दिलेल्या वृत्तानुसार तो स्पर्धेत सहभागी होऊ शकतो कारण त्याच्या ब नमुन्याची चाचणी अद्याप व्हायची आहे. ब नमुन्याचा तपास पॉझिटिव्ह आल्यास मनप्रीतची कामगिरी विचारात घेतली जाणार नाही.(वृत्तसंस्था)

Web Title: Boxer got trapped in Manpreet Dope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.