अमितची नजर आशियाड सुवर्णावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:38 IST2018-04-20T00:38:02+5:302018-04-20T00:38:02+5:30

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कठोर मेहनतीचे फळ मिळाले. मला सुवर्णाची अपेक्षा होती.

Boxer Amit Panghal eyes Asiad medal after silver at CWG | अमितची नजर आशियाड सुवर्णावर

अमितची नजर आशियाड सुवर्णावर

नवी दिल्ली : बॉक्सर अमित पांघल याने २१ व्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. या पदकावर मात्र तो समाधानी नाही. आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठीच आपण रिंकमध्ये उतरू, असा त्याचा निर्धार आहे. माझ्यासाठी हे आव्हान असले तरी स्वत:मधील उणिवा दूर सारून सुवर्ण जिंकू शकतो, असा विश्वासही अमितने व्यक्त केला.
रोहतकचा २२ वर्षांचा अमित म्हणाला,‘ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कठोर मेहनतीचे फळ मिळाले. मला सुवर्णाची अपेक्षा होती, पण रौप्य मिळाले. यावर मी समाधानी नाही. माझे लक्ष्य आशियाडचे सुवर्ण असल्याने माझ्या ठोशांवर काम करणार आहे. काही उणिवा असून त्या दूर करणार आहे. आशियाडमधील आव्हान अवघड आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करावेच लागतील. टॉप योजनेंतर्गत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहोत. या दौºयाचा लाभ उणिवा दूर करण्यास होईल.’
अमितने २०१७ च्या राष्टÑीय स्पर्धेत सुवर्ण जिंकून यशस्वी पदार्पण केले होते. राष्टÑकुल स्पर्धेत नऊ पदके जिंकणे ही भारतीय बॉक्सर्सची यशोगाथा असल्याचे अमितचे मत आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी अमित म्हणाला,‘आपण सर्वसाधारण कामगिरीबाबत बोलाल तर राष्टÑकुलमध्ये आम्ही पहिल्यांदा इतकी पदके जिंकलो. सर्वच बॉक्सर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात आम्ही कठोर सरावात सातत्य राखल्यास आशियाड आणि आॅलिम्पिक पदक आम्हाला हुलकावणी देऊ शकणार नाही, असा मला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Boxer Amit Panghal eyes Asiad medal after silver at CWG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.