बॉक्स पान १

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:06+5:302015-02-13T23:11:06+5:30

बॉक्स...

Box p1 | बॉक्स पान १

बॉक्स पान १

क्स...
स्वामी आर्मीची पार्टी
बार्मी आर्मीच्या धर्तीवर येथे बनलेल्या स्वामी आर्मीचे सदस्य भारत-पाक सामन्याबद्दल उत्सुक आहेत. टीम इंडियाचे समर्थक असलेल्या स्वामी आर्मीची भारताच्या प्रत्येक सामन्यात उपस्थिती असेल. या आर्मीने भारत-पाक सामन्याआधी १४ फेब्रुवारी रोजी आणि सामन्यानंतर १५ फेब्रुवारीला ॲडिलेडमध्ये पार्टीचे आयोजन केले आहे. मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या दोन्ही पार्ट्यांसाठी तिकिटे आहेत. ५५ डॉलरला तिकीट खरेदी करणारे पार्टीला हजेरी लावू शकतात.
..........................................
तिकिटांचा काळाबाजार
भारत-पाक सामन्याच्या तिकिटांचा मोठ्या प्रमाणावर काळाजाबार होत आहे. काळाबाजार करणार्‍यांनी ऑनलाईन तिकिटे आधीच हस्तगत केली. मूळ किमतीपेक्षा जवळपास २० पट अधिक किमतीने ही तिकिटे विकली जात आहेत. स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख जॉन हानेडिन यांच्या मते, तिकिटांची ऑनलाईन विक्री झाल्यामुळे काळाबाजाराला ऊत आला. ऑस्ट्रेलियातील एका वेबसाईटवर काही जण तिकिटांच्या किमती पोस्ट करीत आहेत. इच्छुकांना संपर्क करण्यास सांगितले जात आहे. या साईटमुळेदेखील काळाबाजार फोफावत असल्याचे हानेडिन यांचे मत आहे. आयसीसीच्या विनंतीवरून आता या साईटवरील तिकीटविक्री बंद करण्यात आली आहे.
०००

Web Title: Box p1