गोलंदाजी ॲक्शन
By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:27+5:302014-08-25T21:40:27+5:30
गाजी, उत्सेया यांच्या गोलंदाजी शैलीची चौकशी

गोलंदाजी ॲक्शन
ग जी, उत्सेया यांच्या गोलंदाजी शैलीची चौकशीदुबई : गोलंदाजी शैलीबद्दल शंका उपस्थित केल्यामुळे बांगलादेशचा ऑफ स्पिनर सोहाग गाजी आणि झिम्बाब्वेचा अष्टपैलू क्रि केटपटू प्रोस्पर उत्सेया यांच्या गोलंदाजी ॲक्शनची चौकशी करण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे़ आयसीसीने दिलेल्या निवेदनानुसार गाजी आणि उत्सेया यांच्या संशयास्पद गोलंदाजी शैलीची तक्रार करण्यात आली आहे़ शुक्रवारी वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसर्या वन-डे सामन्यात गाजीच्या गोलंदाजी शैलीवर संशय व्यक्त करण्यात आला होता़ या व्यतिरिक्त गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या वन-डे मध्ये उत्सेयाच्या गोलंदाजी ॲक्शनवर संशय व्यक्त करण्यात आला़ आयसीसीने सांगितले की, गाजीचा रिपोर्ट शनिवारी बांगलादेशचे संघ व्यवस्थापक हबीबुल बशर यांना सोपविण्यात आला आहे़ यामध्ये त्याच्या गोलंदाजी शैलीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे, तर प्रोस्परचा रिपोर्ट झिम्बाब्वे टीमचे व्यवस्थापक स्टेनली लिओजा यांच्याकडे सोपवला आहे़ यामध्ये त्याच्या गोलंदाजी शैलीची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे़ आयसीसीच्या नियामानुसार आता दोन्ही खेळाडंूच्या कसोटी, वन-डे आणि टी-२० तील गोलंदाजी ॲक्शनची चौकशी करण्यात येणार आहे़ दोन्ही खेळाडूंना आता २१ दिवसांच्या आत गोलंदाजीची शैली तपासून घ्यावी लागणार आहे; मात्र यादरम्यान ते आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतील़ याआधी पाकिस्तानचा गोलंदाज सईद अजमल ब्रिसबेनमध्ये संशयास्पद गोलंदाजी ॲक्शनमुळे चौकशी प्रक्रियेतून गेला आहे़ त्यापूर्वी श्रीलंकेचा सचित्रा सेनानायके आणि न्यूझीलंडचा केन विलियम्स यांची गोलंदाजी शैली संशयास्पद आढळून आल्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर बंदी घातली होती़ (वृत्तसंस्था)