गोलंदाजीची चिंता गडद
By Admin | Updated: August 3, 2014 01:34 IST2014-08-03T01:34:49+5:302014-08-03T01:34:49+5:30
चौथ्या कसोटीसाठी मँचेस्टरमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाचे येथे जोरदार पावसाने स्वागत केले.

गोलंदाजीची चिंता गडद
मँचेस्टर : चौथ्या कसोटीसाठी मँचेस्टरमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाचे येथे जोरदार पावसाने स्वागत केले. एजिस बोउलवरील पराभव विसरुन भारतीय संघ चौथ्या कसोटीच्या तयारीत गुंतला असला तरी प्रत्येक बाबींमध्ये त्यांच्यापुढे अडचणी उभ्या आहेत. विशेषत: महेंद्रसिंग धोनीच्या पुढे गोलंदाजीबद्दल भले मोठे प्रश्नचिन्ह आहे. लॉर्डस कसोटीतील विजयाचा शिल्पकार इशांत शर्मा दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतही खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतर गोलंदाजांची कामगिरीही उठून दिसत नाही. ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळविण्यासाठी 20 बळी घेणो गरजेचे असते. पण दहा बळी मिळविणोही आम्हाला दुरापास्त झाले आहे, हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे’’ असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रांजळपणो कबुल केले. भुवनेश्वरच्या दुखापतीने धोनीची डोकेदुखी वाढली आहे. चौथ्या सामन्यापूर्वी तो दुखापतीमधून सावरेल असे संघाला वाटते. पण ईशांत शर्माच्या बाबतीत असे ठोसपणो कोणालाही वाटत नाही.
भुवनेश्वरकुमारने 125 षटके गोलंदाजी केली आहे. तर ईशांत शर्माने दोन कसोटीत 85 षटके टाकली आहेत. लॉर्डसवर भुवनेश्वरने सरासरी 130 च्या वेगात गोलंदाजी केली. पण एजीस बोउलवर हा वेग 120 र्पयत घसरला. इशांतच्या अनुपस्थिीतीमुळे त्याच्यावर वर्कलोड वाढला असल्याचे धोनी मान्य करतो. तो म्हणाला, मला वाटते भुवीला थकवा जाणवतोय. पहिल्या दोन कसोटीत त्याने योग्य टप्प्यावर आणि दिशेने गोलंदाजी केली परंतु तिस:या कसोटीत तो थोडा कमी पडला. भारताला 13 दिवसात दोन कसोटी सामने खेळावयाचे असताना परिस्थिती मात्र भारतासाठी लाभदायक असल्याचे दिसून येत नाही. भारतीय पथकात 18 खेळाडू असले तरी जलदगती गोलंदाजी विभागात सगळा ‘आनंद’च आहे.
धोनीने चार गोलंदाज खेळविण्याच्या योजनेचा पुनर्विचार करणार असल्याचे सांगितले आहे, ओल्ड ट्रॅफोर्डची खेळपट्टी जलदगती गोलंदाजीला मदत करणारी असल्यामुळे पाचवा गोलंदाज हा फास्टरच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर अश्विनला शेवटच्या कसोटीर्पयत वेंटिंगवरच रहावे लागेल असे दिसते. झारखंडच्या वरुन अॅरोनला खेळविण्याला धोनी प्राधान्य देईल असे वाटते. अॅरॉनकडे चांगला वेगही आहे, अन स्टॅमिनाही. 24 वर्षीय अॅरॉन 140 च्या वेगाने नियंत्रित गोलंदाजी करु शकतो. गेल्या सत्रत रणजीतील सर्वाधिक बळी मिळविणारा उत्तरप्रदेशचा ईश्वर पांडेचा पर्यायही धोनीकडे आहे. स्टुअर्ट बिन्नीला खेळविण्याला धोनी प्राधान्य देईल असे वाटत नाही.
या मालिकेत भारताचा मुख्य यशस्वी गोलंदाज भुवनेश्वरकुमार हा जखमी झाला आहे. तो जर सावरला नाही, तर भुवीच्या अनुपस्थितीत आधीच लंगडे झालेले भारतीय आक्रमण बिन दाताच्या वाघासारखे होईल, आणि हे भारत आणि धोनीसाठी चांगले संकेत नाही.
कसोटी पदार्पण करणा:या पंकज सिंगने टप्प्याटप्याने चांगली गोलंदाजी केली. स्लीपमधील क्षेत्ररक्षकांनी त्याच्या कामगिरीला न्याय दिला नाही, असे दुदैर्वाने म्हणावे लागेल. नशीब त्याच्या बाजून असते तर अॅलिस्टर कुकची 15 धावांवर आणि इयान बेलची शुन्यावरची विकेट त्याच्या खात्यात दिसली असती. कदाचित या दोन बळीमुळे सामन्याचा निकालच बदलला असता, अन कदाचित पंकजसिंगचे नशीबही. पण तो विकेटलेस राहील्याने त्याचे भवितव्य अधांतरी लटकले आहे.
ब्रिटीश मीडियाकडून धोनीची खिल्ली
लंडन : जेम्स अॅण्डरसनविरुद्ध आरोपासाठी हट्ट धरल्यामुळे ब्रिटीश मीडियाने भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका केली. इंग्लंडचा हा गोलंदाज दोषमुक्त होणो म्हणजे भारतासाठी अपमानस्पद आहे, असे ब्रिटीश मीडियाने म्हटले आहे. न्यायिक आयुक्त गोर्डन लुईसने रवींद्र जडेजा आणि जेम्स अॅण्डरसन हे शुक्रवारी सहा तासाच्या सुनावणीनंतर अपशब्द वापरणो आणि धक्का देणो या प्रकरणी दोषी आढळले नाहीत. यावर ‘डेली टेलिग्राफ’ने अॅण्डरसन दोषमुक्त झाल्याने भारताचा अपमान झाल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)