गोलंदाजांना सुद्धा विजयाचे श्रेय दिले पाहिजे : रहाणे
By Admin | Updated: September 4, 2014 01:46 IST2014-09-04T01:46:45+5:302014-09-04T01:46:45+5:30
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात शतकाच्या बळावर भारतीय संघाला विजय मिळवून देता आला,

गोलंदाजांना सुद्धा विजयाचे श्रेय दिले पाहिजे : रहाणे
बर्मिगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात शतकाच्या बळावर भारतीय संघाला विजय मिळवून देता आला, याचा अभिमान असल्याचे मत टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणो याने व्यक्त केले आह़े
रहाणो पुढे म्हणाला, की या विजयाचे श्रेय भारतीय गोलंदाजांनाही दिले पाहिज़े त्यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर इंग्लंड संघ माफक धावसंख्या उभी करू शकला़ गेल्या काही दिवसांपासून मी आपल्या फलंदाजीवर विशेष मेहनत घेत होतो़ त्याचं फळ मला इंग्लंडविरुद्ध मिळाले आह़े आता यापुढेही आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न राहील, असेही तो म्हणाला़
रहाणोने धवनचेही कौतुक केले. तो म्हणाला, शिखर धवन हासुद्धा मोक्याच्या क्षणी फॉर्ममध्ये परतला आह़े संघाला चांगली सुरुवात करून देण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले होत़े त्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा आनंद आह़े कसोटी मालिकेत झालेल्या पराभवामुळे संघावर टीका होत होती़ मात्र, आता वन-डे मालिकेत इंग्लंडला धूळ चारल्यामुळे संघाला खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आह़े
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी करणारा धवन म्हणाला, की कसोटी मालिकेत सपशेल अपयशी ठरल्यामुळे
वन-डेत विशेष कामगिरी करण्याचा प्रयत्न होता़
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करता आली याचा आनंद आह़े यापुढेही फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न राहणार आह़े (वृत्तसंस्था)
भारतीय संघासोबत जुडल्यापासून शास्त्री यांनी खेळाडूंत नवीन आत्मविश्वास भरण्याचे काम केले आह़े विशेष म्हणजे दुस:या वन-डेतील चांगल्या कामगिरीनंतर सुरेश रैना यानेही शास्त्री यांचे कौतुक केले होत़े - धवन