गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले : रोहित
By Admin | Updated: April 15, 2016 04:17 IST2016-04-15T04:17:46+5:302016-04-15T04:17:46+5:30
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ९च्या लढतीत त्यांच्याच मैदानावर ६ विकेटनी विजय नोंदवल्यानंतर आनंद व्यक्त करताना गत चॅम्पियन मुंबई

गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले : रोहित
कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ९च्या लढतीत त्यांच्याच मैदानावर ६ विकेटनी विजय नोंदवल्यानंतर आनंद व्यक्त करताना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांनी योग्य वेळी पुनरागमन करताना एक वेळ विशाल धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या कोलकाता संघाला कमी धावसंख्येवर रोखले असल्याचे म्हटले.
या सामन्यात स्वत: रोहित शर्माने ८४ धावांची नाबाद विजयी खेळी केली आणि ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्कार पटकावला. विजयानंतर तो म्हणाला, ‘‘हा विशाल धावसंख्या असणारा सामना होता. त्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडला. आम्ही कोलकाता संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवल्याचा आनंद वाटतोय. कोलकात्याच्या डावादरम्यान आम्ही १० ते १५ धावा अतिरिक्त दिल्या; परंतु अखेर आमच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि विशाल धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखले. कोलकात्याच्या फलंदाजांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून ते सहज २०० धावांकडे वाटचाल करीत होते; परंतु आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.’’
रोहितने म्हटले, ‘‘आम्ही लक्ष्याचा पाठलाग चांगला केला. विशेषत: जोस बटलर आणि मी शानदार फलंदाजी केली. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती आणि आम्ही योजनेनुरूप फलंदाजी केल्याचा मला आनंद वाटतोय. (वृत्तसंस्था)