विराटच्या डोक्यावर बाउन्सर अन् स्टेडियम स्तब्ध..
By Admin | Updated: December 12, 2014 01:46 IST2014-12-12T01:46:38+5:302014-12-12T01:46:38+5:30
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या डोक्यावर आदळला तेव्हा अख्खे स्टेडियम स्तब्ध झाल़े या चेंडूनंतर पुन्हा एकदा ह्युजबद्दल घडलेल्या दुर्दैवी घटनेची सर्वाना आठवण झाली़

विराटच्या डोक्यावर बाउन्सर अन् स्टेडियम स्तब्ध..
अॅडिलेड : बाउन्सर लागून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जलदगती गोलंदाज मिशेल जॉन्सन याचा एक वेगवान चेंडू भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या डोक्यावर आदळला तेव्हा अख्खे स्टेडियम स्तब्ध झाल़े या चेंडूनंतर पुन्हा एकदा ह्युजबद्दल घडलेल्या दुर्दैवी घटनेची सर्वाना आठवण झाली़
भारताचा मुरली विजय (53) 31 व्या षटकांतील पहिल्या चेंडूंवर बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानावर आला़ तेव्हा त्याच्या समोर ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज मिशेल जॉन्सन हा होता़ जॉन्सनने विराटला पहिलाच चेंडू बाउन्सर टाकला़
काही कळण्याच्या आत हा चेंडू कोहलीच्या डोक्यावर जाऊन आदळला आणि अख्खे स्टेडियम स्तब्ध झाल़े यानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्वच खेळाडू कोहलीच्या
भोवती जमा झाले आणि त्याची चौकशी केली़ मात्र, विराटने
हेल्मेट काढले आणि सर्वकाही
ठीक असल्याचे सांगून पंचांना
पुढे खेळ सुरू करण्याचा इशारा
केला आणि यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला़ जॉन्सन याने हा चेंडू 9क् कि़मी़ प्रतितास या वेगाने
टाकला होता़
दरम्यान, यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियन वेगवान मा:याला न जुमानता शानदार 115 धावांची खेळी केली आणि आपण सवरेत्कृष्ट खेळाडू असल्याचे दाखवून दिल़े तीन आठवडय़ांपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजचा एका स्थानिक सामन्यात सीन एबोटचा बाउन्सर डोक्यावर लागून मृत्यू झाला होता़ यानंतर बाउन्सरवर बंदी घालावी किंवा नाही, यावर चर्चा सुरू झाली होती़ (वृत्तसंस्था)