बोपन्नाची माघार?
By Admin | Updated: September 5, 2014 02:11 IST2014-09-05T02:11:20+5:302014-09-05T02:11:20+5:30
आशियाडमध्ये भारतीय टेनिसचे आव्हान स्पर्धेआधीच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

बोपन्नाची माघार?
नवी दिल्ली : आशियाडमध्ये भारतीय टेनिसचे आव्हान स्पर्धेआधीच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. दिग्गज खेळाडू रोहन बोपन्ना याच्या इंचियोन आशियाडमधील सहभागावर संशयाची टांगती तलवार आहे. यंदा व्यावसायिक टेनिसमधील निराशाजनक कामगिरीची भरपाई म्हणून रोहन एटीपी टूर खेळण्यासाठी जाणार आहे. गतवर्षी एटीपी टूर रँकिंगमध्ये बोपन्ना वर्ल्ड नंबर तीन होता.
बोपन्नाने माघारीचा निर्णय घेतल्यास भारतीय टेनिस संघाला धक्का बसेल. याआधी सोमदेव देवबर्मन याने याच कारणास्तव संघातून माघार घेतली. आशियाड आणि डेव्हिस चषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणारा आनंद अमृतराज म्हणाला, ‘सोमदेवसारखीच रोहनची स्थिती आहे. रोहन दुहेरीत आशियाडचे सामने खेळणार किंवा नाही, हे निश्चित नाही. बुधवारी त्याची माङयासोबत चर्चा झाली, पण अद्याप निर्णय घेतला नाही.’ गेल्या काही वर्षात सोमदेव आणि रोहन यांनी भारतासाठी डेव्हिस चषकात सातत्याने धडक कामगिरी केली, हे विशेष. पाकचा एसाम उल हक कुरेशी याच्यासोबत दुहेरीची जोडी बनविल्यानंतर बोपन्नाला यंदा बॅकफुटवर यावे लागले. तो केवळ दुबई एटीपी 5क्क् स्पर्धा जिंकू शकला. वर्षाच्या सुरुवातीला तो 13व्या स्थानावर होता. आता 29व्या स्थानावर घसरला. अमेरिकन ओपनमध्ये बोपन्ना आणि सोमदेव पहिल्याच फेरीत बाहेर पडले. (वृत्तसंस्था)