गुणांच्या जोरावर मुंबईला किताब

By Admin | Updated: February 7, 2015 01:34 IST2015-02-07T01:34:59+5:302015-02-07T01:34:59+5:30

पश्चिम विभागीय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुणांच्या जोरावर मुंबईला अजिंक्यपदाचा मान मिळाला.

A book in Mumbai on the basis of marks | गुणांच्या जोरावर मुंबईला किताब

गुणांच्या जोरावर मुंबईला किताब

पुणे : पश्चिम विभागीय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुणांच्या जोरावर मुंबईला अजिंक्यपदाचा मान मिळाला. शुक्रवारी पार पडलेल्या लढतीत बडोदा संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईविरुद्ध वर्चस्व राखले. मात्र स्पर्धेत ८ गुणांसह मुंबई अव्वल असल्याने त्यांना अजिंक्यपद मिळाले, तर सात गुणांसह बडोदा संघाने उपविजेतेपद राखले.
पिंपरीच्या व्हेरॉक मैदानावर झालेल्या सामन्यात बडोदाने वर्चस्व राखले. बडोदाने मुंबईला पहिल्या डावात १७८ धावांवर रोखले होते. याचा पाठलाग करताना बडोदाने पहिल्या डावात १२९ षटकांत २७८ धावा करून आघाडी घेतली. अथर्व कारुलकर (८१), कुश मराठे (६३) व अश्रय पटेल (नाबाद ५१) यांच्या खेळीने बडोदा संघाने आघाडी घेतली. मुंबईने दुसऱ्या डावात ७८ षटकांत २२२ धावा केल्या.
सलामीवीर दिव्यांश सक्सेना व सुवेद पारकर यांनी शतकी खेळी करीत चांगली फलंदाजी केली. दिव्यांशने १६ चौकारांच्या साहाय्याने १०३, तर पारकर याने १९ चौकारांच्या साहाय्याने १०६ धावा फटकावल्या.
(क्रीडा प्रतिनिधी)

मुंबई : पहिला डाव - ७५ षटकांत सर्वबाद १७८ धावा (दिव्यांश सक्सेना ३७, सुवेद पारकर ४४, सिराज घरत नाबाद ६०, अंश पटेल ७/५३, किनीत पटेल ३/१७); दुसरा डाव - ७८ षटकांत १ बाद २२२ धावा (दिव्यांश नाबाद १०३, सुवेद नाबाद १०६, अश्रय पटेल १/२२) अनिर्णीत वि. बडोदा : पहिला डाव -१२६ षटकांत ८ बाद २७२ (मानव परमार २२, अथर्व कारुलकर ८१, कुश मराठे ६३, अश्रय पटेल नाबाद ५१; राजेश सरदार ६/६५, कौशभ चाळके १/४५, यश साळुंके १/२५)

Web Title: A book in Mumbai on the basis of marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.