बोल्ट, जोकोविच, मेस्सीला नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 04:07 IST2016-03-03T04:07:27+5:302016-03-03T04:07:27+5:30

लॉरेस क्रीडा पुरस्कार २०१६ साठीचे नामांकन जाहीर झाले असून, क्रीडाजगतातील महान खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. १८ एप्रिलला बर्लिन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

Bolt, Djokovic, Messi Nomination | बोल्ट, जोकोविच, मेस्सीला नामांकन

बोल्ट, जोकोविच, मेस्सीला नामांकन

बर्लिन : लॉरेस क्रीडा पुरस्कार २०१६ साठीचे नामांकन जाहीर झाले असून, क्रीडाजगतातील महान खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. १८ एप्रिलला बर्लिन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी तीन वेळा पुरस्कार विजेता उसेन बोल्ट, टेनिसपटू नोव्हाक जोकोविच, तीन वेळा फॉर्म्युला वन विजेता लेविस हॅमिल्टन, फुटबॉलपटू लिओनल मेस्सी यांच्यासह एनबीएचा स्टार खेळाडू स्टिफन करे व नंबर १ चा गोल्फपटू जॉर्डन स्पेथ यांना प्रथमच नामांकन मिळाले आहे. तसेच, २०१५ मध्ये तीन ग्रॅँडस्लॅम विजेती टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पुन्हा एकदा नामांकन मिळाले आहे. या प्रकारात तिला दहा वेळा नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट संघासाठीच्या नामांकनामध्ये मर्सिडिस बेंझ फॉर्म्युला वन टीम, बार्सिलोना फुटबॉल क्लब, गोल्डन स्टेट वॉरियर्स, ब्रिटनचा डेव्हिस कप टेनिस संघ व तीन वेळा विश्वचषक फुटबॉल विजेता अमेरिकेचा महिला फुटबॉल संघ यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी सात विविध प्रकारांतील नामांकने जाहीर झाली असून, या प्रत्येक प्रकारात सहा जणांना नामांकन देण्यात आले आहे.

Web Title: Bolt, Djokovic, Messi Nomination