बोहल्यावरून थेट आखाड्यातच

By Admin | Updated: November 11, 2016 01:04 IST2016-11-11T01:04:56+5:302016-11-11T01:04:56+5:30

लग्नात हातावर काढलेल्या मेहंदीचा रंग गडद असतानाच आणि अंगाला लागलेली हळद अजूनही ओली असतानाच महिला मल्ल गीता फोगट लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी

Bohlaya directly in the akhada | बोहल्यावरून थेट आखाड्यातच

बोहल्यावरून थेट आखाड्यातच

प्रो कुस्ती लीग : ‘एका लग्नाची’ वेगळी गोष्ट
नवी दिल्ली : लग्नात हातावर काढलेल्या मेहंदीचा रंग गडद असतानाच आणि अंगाला लागलेली हळद अजूनही ओली असतानाच महिला मल्ल गीता फोगट लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी प्रो कुस्ती लीगच्या आखाड्यात उतरणार आहे. शिवाय ती लग्नाच्या आदल्यादिवसापर्यंत सरावात व्यस्त राहणार असल्याने एका अर्थाने गीताच्या लग्नाची गोष्ट वेगळी ठरणार आहे.
प्रो कुस्ती लीगबाबत गीता खूपच गंभीर आहे. २0 नोव्हेंबरला तिचे लग्न होणार आहे, परंतु लग्नाच्या आदल्यादिवसापर्यंत ती सराव करीत राहणार आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्याऐवजी तीन दिवसानंतर ती आखाड्यात परतणार आहे. सध्या ती आपल्या आंगणात बनवलेल्या आखाड्यात वडील महावीर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. गीताचा भाऊ दुष्यंत तिला सरावात मदत करीत आहे. सगळ्या कुटुंबाचे एकच लक्ष्य आहे, गीताला आपल्या वजन गटात पुन्हा अव्वल स्थान मिळवणे. मेहंदीच्या हाताने सराव कुस्तीचा सराव करण्याचे असे उदाहरण क्वचितच पहायला मिळेल. काही वर्षापर्यंत आपल्या वजनगटात तिची वर्चस्व होते.

Web Title: Bohlaya directly in the akhada