बॉडी बिल्डिंग संघटनेचा पर्दाफाश
By Admin | Updated: October 9, 2015 04:52 IST2015-10-09T04:52:19+5:302015-10-09T04:52:19+5:30
बनावट कागदपत्राद्वारे शरीरसौष्ठव संघटना स्थापन करणे, सरकारकडून अनुदान लाटणे व खेळाडूंचा विश्वासघात केल्याच्या आरोपावरून इंडियन बॉडी बिल्डर फेडरशेनच्या पदाधिकाऱ्यांसह

बॉडी बिल्डिंग संघटनेचा पर्दाफाश
- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
बनावट कागदपत्राद्वारे शरीरसौष्ठव संघटना स्थापन करणे, सरकारकडून अनुदान लाटणे व खेळाडूंचा विश्वासघात केल्याच्या आरोपावरून इंडियन बॉडी बिल्डर फेडरशेनच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडा मंत्रालयाचे संयुक्त सचिव ओंकार केडिया यांच्या विरोधात पार्लमेंट रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी माहिती देताना इंडियन बॉडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस फेडरेशनचे (औरंगाबाद) महासचिव संजय मोरे म्हणाले, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणतीही पडताळणी न करता १९ जुलै २०१२ रोजी मान्यता दिली. संघटनेने सादर केलेल्या कागदपत्रांची कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही. केंद्रीय मंत्रालयाच्या मान्यतेमुळे या संघटनेला भारतासह जगभरात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांना सरकारकडून अनुदान देखील देण्यात आले. इतकेच काय तर संघटनेच्या माध्यमातून काही खेळाडूंना रल्वे सहीत विविध ठिकाणी नोकरी देखील मिळाली आहे.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबई व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन नावाच्या दोन वेगवेगळ््या संघटना आहेत. त्यांचे संचालक म्हणून मुंबईचे चेतन पठारे व हरियाणाचे के अमित स्वामी आहेत.
त्यांनी केंद्रीय मंत्रालयाला खोटी कागदपत्रे सादर करून आमच्या संघटनांचे विलिनीकरण झाले असल्याचे सांगितले. मात्र मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांकडून
१३ मे २०१५ साली मिळालेल्या माहिती नुसार या दोन्ही संघटनांचे विलिनीकरण झालेले नाही. त्यामुळे नवीन संघटना आपोआपच
रद्द होत असल्याचे मोरे म्हणाले. तत्कालिन संयुक्त सचिवांशी हातमिळवणी करुन संघटनेला मान्यता घेण्यात आली. त्या वेळी क्रीडा मंत्री हणून अजय माकन हे होते, असेही ते म्हणाले.
क्रीडा मंत्रालयाची सापत्न वागणूक
इंडियन बॉडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस फेडरेशन या संघटनेला इंडियन आॅलिम्पिक असोसिएशन, आशियाई क्रडा संघटना व वर्ल्ड अॅण्टी डोपिंग असोसिएशनकडून मान्यता मिळालेली आहे. असे असतानाही क्रीडा मंत्रालय मान्यता देत नाही, म्हणजे मंत्रालय एकप्रकारे सापत्न वागणूक देत आहे.
तत्कालीन क्रीडामंत्री अजय माकन यांनी इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन या संघटनेची शिफारस केली होती. त्या नुसारच त्या संघटनेला मान्यता देण्यात आली आहे.
- ओंकार केडिया,
संयुक्त क्रीडा सचिव