बिंद्रा मदत
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30
बिंद्रा, असाब, केशवन यांना

बिंद्रा मदत
ब ंद्रा, असाब, केशवन यांना क्रीडा मंत्रालयाचे अर्थसानवी दिल्ली : बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, मोहंमद असाब आणि शिवा केशवन यांना क्रीडा मंत्रालय सरावासाठी आर्थिक सा करणार आहे.बिंद्राला खासगी फिजिओ तसेच तयारी तज्ज्ञाची मदत घेण्यासाठी ११२.५० लाखांचा निधी देण्यास मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधीची परवानगी मिळाली. १ जुलै २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत फिजिओ व तयारी तज्ज्ञावर बिंद्राच्या तयारीवर दर महिन्याला ६० हजार खर्च होईल. याशिवाय भोजन, निवास, हवाई प्रवास आणि भत्ता हा खर्च मिळून ११२.५० लाखांचे बजेट तयार करण्यात आले. दुसरा नेमबाज मोहंमद असाबला १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत इटलीत आयोजित १४ दिवसांच्या सरावासाठी एकूण रकमेच्या ९० टक्के रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिली जाईल. शिवा केशवन यालादेखील दहा लाख रुपयांचे अर्थसा मंजूर करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था).....................................................