आश्विनपासून सर्वांत अधिक धोका : प्लेसिस
By Admin | Updated: November 3, 2015 03:59 IST2015-11-03T03:59:47+5:302015-11-03T03:59:47+5:30
टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत

आश्विनपासून सर्वांत अधिक धोका : प्लेसिस
मोहाली : टी-२० आणि वन-डे सामन्यांची मालिका जिंकल्यानंतरही पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आगामी कसोटी मालिकेत भारतातील फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत चिंता सतावत आहे. आगामी मालिकेत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान राहील, असे मत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू ुप्लेसिसने व्यक्त केले.
आगामी कसोटी मालिकेत खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल राहतील अशी आशा आहे का, याबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल राहील, अशी आशा आहे आणि त्यानुसार योजना आखली जाईल. माझ्या मते, भारतीय क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक झाले आहे. सुरुवातीला भारतातील खेळपट्ट्याकडून तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती; पण आता पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळायला सुरुवात होते.’’
गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘याचा अर्थ, कसोटी सामना ५ दिवस चालणार नाही. कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपणार असेल, तर त्यादृष्टीने योजना आखून आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.’’ दुखापतीतून सावरल्यानंतर कसोटी मालिकेत पुनरागम करीत असलेल्या आश्विनच्या आव्हानाला सामोरे जाणे महत्त्वाचे ठरेल, असेही ड्युप्लेसिसने सांगितले.
ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘आश्विन जागतिक दर्जाचा फिरीकपटू आहे; पण टी-२० मालिकेत आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो आहोत. आता कसोटी क्रिकेटचा प्रश्न आहे. येथे त्याला अधिक टर्न मिळेल.’’
ड्युप्लेसिसने सांगितले, ‘आश्विनला खेळणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे; पण आम्ही त्यासाठी योजना आखली आहे. आश्विनला आम्ही कसे खेळतो, यावरच या मालिकेचा निकाल अवलंबून राहील.’’
मोहालीच्या खेळपट्टीबाबत ड्युप्लेसिस म्हणाला, ‘‘खेळपट्टी कोरडी भासत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा आहे. सध्या खेळपट्टी तशीच वाटत आहे.’’ ड्युप्लेसिसने मुंबईत खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्या भारतीय संघव्यवस्थापनावर नेम साधला.(वृत्तसंस्था)
भारतीय संघाने विजय मिळविला असता तर तक्रार केली असती, असे वाटत नाही. या दौऱ्यात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मोहालीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाच्या यशात वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्कलची भूमिका महत्त्वाची ठरेल.
- फाफ डू प्लेसिस