दिग्गज खेळाडूंना बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा
By Admin | Updated: August 1, 2016 05:43 IST2016-08-01T05:43:00+5:302016-08-01T05:43:00+5:30
शिव थापा, विकास कृष्णन आणि मनोजकुमार या तिघांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत बॉक्सिंगमध्ये आॅलिम्पिक पदक मिळेल

दिग्गज खेळाडूंना बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा
नवी दिल्ली : शिव थापा, विकास कृष्णन आणि मनोजकुमार या तिघांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत बॉक्सिंगमध्ये आॅलिम्पिक पदक मिळेल, अशी आशा दिग्गज बॉक्सरनी व्यक्त केली आहे. २००८ बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग, लंडन आॅलिम्पिक २०१२ ची कांस्यपदक विजेती एम सी मेरीकोम आणि बीजिंगमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारलेला अखिलकुमार या तिघांनी तरुण खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. विजेंदरसिंग म्हणाला, हे तिघेही दुसऱ्यांदा आॅलिम्पिकमध्ये खेळत आहेत, त्यांच्यावर दबाव असला तरी ते तिघेही पदकांसह परत येतील. मेरी कोमही विजेंदरच्या सुरात सूर मिसळत म्हणाली, दबावाचा सामना करण्याची त्यांच्यात क्षमता असल्यामुळे ते तिघे नक्की
यशस्वी होतील.