शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

Hockey India, Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाला सेमीफायनल आधी मोठा धक्का; स्टार खेळाडूवर एका सामन्याची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:33 IST

Amit Rohidas Red Card, Hockey India, Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ उद्या जर्मनी विरूद्ध खेळणार हॉकीची सेमीफायनल

Amit Rohidas Red Card, Hockey India, Paris Olympics 2024: भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये ( India vs Germany Semifinal ) सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला. भारताने निर्धारित सामना १-१ अशा बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतीय आक्रमण ग्रेट ब्रिटनवर भारी पडले. भारताने ४-२ने सामना जिंकला. आता भारताचा सेमीफायनलचा सामना जर्मनीविरूद्ध होणार आहे. त्याआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार डिफेंडर म्हणजे बचावपटू अमित रोहिदास याला जर्मनीविरूद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे.

स्टार बचावपटू अमित रोहिदासला ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रेड कार्ड मिळाले होते. त्यामुळे आता त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच मंगळवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या ऑलिम्पिक उपांत्य फेरीत तो खेळू शकणार नाही. म्हणजेच भारताला १५ खेळाडूंसह सामन्याची रणनिती आखावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अमित रोहिदासला ४ ऑगस्ट रोजी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान FIH आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा परिणाम म्हणून सामना क्रमांक ३५ (भारत वि. जर्मनी - उपांत्य फेरी) मध्ये अमित रोहिदासला सहभागी होता येणार नाही. भारत केवळ १५ खेळाडूंचाच वापर करु शकेल.

भारताचा उपांत्यपूर्व फेरीत रोमहर्षक विजय

सामन्याच्या पूर्वार्धात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीलाच भारताच्या अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे उर्वरित सामना भारताला १० खेळाडूंसोबत खेळावा लागला होता. २२व्या मिनिटाला भारताकडून हरमनप्रीतने गोल केला. तर २७व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनच्या ली मॉर्टन याने गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात पुन्हा गोल झाला नाही. निर्धारित वेळेत सामना १-१ असा सुटल्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय घेण्याचे ठरले. त्यात भारताने ग्रेट ब्रिटनला ४-२ असे पराभूत करत सेमीफायनल गाठली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४IndiaभारतHockeyहॉकीGermanyजर्मनी