राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्लेव्हरडेलमध्ये सायकल रॅली

By Admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:32+5:302014-08-28T23:09:32+5:30

औरंगाबाद : एमजीएम संचलित क्लेव्हरडेल स्कूलतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाळेच्या प्रशासक मीता कपूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. याचे औचित्य साधून ३0 ऑगस्ट रोजी आयोजित या रॅलीत २00 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून जनजागृती वाढवणे हा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी प्राचार्या सविता नरवडे यांनी एमजीएम क्लेव्हरडेल हायस्कूलतर्फे दरवर्षी क्रीडादिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. राजेश रणजीत यांनी पुढील वर्षी इतर शळांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक सागर शेवाळे उपस्थित होते.

Bicycle Rally in Cleverdale on National Sports Day | राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्लेव्हरडेलमध्ये सायकल रॅली

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त क्लेव्हरडेलमध्ये सायकल रॅली

ंगाबाद : एमजीएम संचलित क्लेव्हरडेल स्कूलतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाळेच्या प्रशासक मीता कपूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. याचे औचित्य साधून ३0 ऑगस्ट रोजी आयोजित या रॅलीत २00 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून जनजागृती वाढवणे हा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी प्राचार्या सविता नरवडे यांनी एमजीएम क्लेव्हरडेल हायस्कूलतर्फे दरवर्षी क्रीडादिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. राजेश रणजीत यांनी पुढील वर्षी इतर शळांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी क्रीडा शिक्षक सागर शेवाळे उपस्थित होते.
सायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे यांच्या हस्ते सकाळी १0 वाजता होणार आहे. या रॅलीचा मार्ग क्लेव्हरडेल-सेव्हन हिल, गजानन मंदिर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, कॅनॉट गार्डन, जालना रोड, सेव्हन हिल व क्लेव्हरडेल असा असणार आहे.

Web Title: Bicycle Rally in Cleverdale on National Sports Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.