भुवनेश्वर व त्याच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: August 9, 2015 22:43 IST2015-08-09T22:43:36+5:302015-08-09T22:43:36+5:30

भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जमिनीशी निगडित व्यवहाराप्रकरणी जिवे मारण्याची

Bhubaneswar and his father threaten to kill him | भुवनेश्वर व त्याच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी

भुवनेश्वर व त्याच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी

मेरठ : भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि त्याच्या वडिलांना जमिनीशी निगडित व्यवहाराप्रकरणी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मेरठ पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रवक्त्याने भुवनेश्वरचे वडील किरणपालसिंह द्वारा मेरठच्या इंचौली ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर ही माहिती दिली.
किरणपालसिंह यांनी बुलंद शहरातील बरारी या गावातील रणबीरसिंह यांच्याशी ८० लाख रुपयांचा जमिनीचा व्यवहार केला होता, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनुसार भुवनेश्वरच्या वडिलांनी ही रक्कम इंटरनेट बँकिंगद्वारे जमा केली. त्याचा बयाणा एप्रिलमध्ये झाला होता; परंतु एका प्रकरणात बुलंद शहर तुरुंगात अटक असलेल्या रणबीरने बयाणावर स्वाक्षरी केली नव्हती.(वृत्तसंस्था)

Web Title: Bhubaneswar and his father threaten to kill him