शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

BHAVANI DEVI : बांबूच्या काठीने सराव करणाऱ्या तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुलमध्ये जिंकलं सुवर्णपदक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:00 AM

BHAVANI DEVI IS THE CWG CHAMPION : ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला होता

BHAVANI DEVI IS THE CWG CHAMPION : भारताची स्टार तलवारबाज भवानी देवीने बुधवारी राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद २०२२ स्पर्धेत वरिष्ठ महिला Sabre Individual categoryचे सुवर्णपदक जिंकले. गतविजेत्या भवानीने जेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या व्हेरोनिका व्हॅसिलेव्हाचा १५-१० असा पराभव केला. भवानीने २०१९मध्ये याच क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते आणि हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. 

लंडनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीला पहिल्या फेरीत बाय मिळाला. दुसऱ्या फेरीत तिने अलेक्झांड्रा डेविहाडचा १५-६ असा पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव लौकिक करणाऱ्या भवानीने उपांत्य पेरीत स्कॉटलंडच्या ल्युसी हिघ‌ॅमवर १५-५ असा सहज विजय मिळवला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूने कडवी टक्कर दिली. पण, भवानीने दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवलं.  

Chadalavada Anandha Sundhararaman Bhavani Devi हे तिचे पूर्ण नाव... वयाच्या १२व्या वर्षी तिनं चेन्नईत पार पडलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तलवारबाजीत सुवर्णपदक जिंकले. तामिळनाडूचे हे या क्रीडा प्रकारातील पहिलेच पदक होते. बांबूच्या काठीपासून तिनं तलवारबाजी करण्यास सुरुवात केली. संकटाला तोंड देत तिनं आपलं तलवारबाज बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं, अर्थात या सर्व प्रवासात तिच्या कुटुंबीयांची विशेषतः आईची प्रत्येकवेळी खंबीर साथ मिळाली. तलवारबाजी हा खर्चीक खेळ आहे आणि भवानीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे भवानी बांबुच्या काठीपासून सराव करायची अन् तलवारीचा फक्त स्पर्धेत उपयोग करायची. भवानीला चिअर करण्यासाठी तिची आईही टोकियोत दाखल झाली होती. वयाच्या 14व्या वर्षी तिला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली होती, परंतु स्पर्धा ठिकाणी उशीरा पोहोचल्यामुळे तिला ब्लॅक कार्ड दाखवून बाद करण्यात आले. पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून ती खूप उत्साहात होती.

आयोजकांनी तिला स्टेडियमसाठी सकाळी 7.30 वाजता निघायचं आहे असे सांगितले. पण, प्रवासात आम्हाला उशीर झाला आणि आयोजकांनी मला बसमध्येच तलवारबाजीचे कपडे घालण्यास सांगितले, असे तिने सांगितले. लाजाळू स्वभावाच्या भवानी देवीनं कसेबसे ते कपडे घातले अन् स्टेडियमवर पोहोचली. परंतु त्याआधीच तीनवेळा तिच्या नावाची घोषणा झाली अन् तिला बाद ठरवण्यात आले. त्यानंतर ती संपूर्ण दिवस रडली होती. अशा अनेक वाईट अनुभवांतून भवानी देवी शिकत गेली अन्  ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.

टॅग्स :FencingफेंसिंगCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा