भांब्री, मायनेनी उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: October 23, 2014 00:20 IST2014-10-23T00:20:13+5:302014-10-23T00:20:13+5:30

इंदोर एटीपी स्पर्धेतील विजेता साकेत मायनेनी व सातव्या मानांकित युकी भांब्री या भारताच्या खेळाडूंनी आपली विजयी

Bhambri, Myneni in the quarter-finals | भांब्री, मायनेनी उपांत्यपूर्व फेरीत

भांब्री, मायनेनी उपांत्यपूर्व फेरीत

पुणे : इंदोर एटीपी स्पर्धेतील विजेता साकेत मायनेनी व सातव्या मानांकित युकी भांब्री या भारताच्या खेळाडूंनी आपली विजयी घौडदौड कायम ठेवत ५० हजार डॉलर एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीतच सोमदेव देववर्मन, आशियाई क्रिडा स्पर्धेतील रजतपदक विजेता सनम सिंग व क्वालिफायर विजय सुंदर प्रशांत व राष्ट्रीय विजेता विष्णू वर्धन या भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्यावतीने म्हाळुंगे -बालेवाडी येथिल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत एकतर्फी लढतीत बिरगामानांकित व भारताच्या साकेत मायनेनीने जपानचा पाचवा मानांकित हिरोकी मोरियाचे आव्हान मोडीत काढले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Bhambri, Myneni in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.