भज्जीची ‘टुक-टुक’ सफारी

By Admin | Updated: August 26, 2015 04:20 IST2015-08-26T04:20:08+5:302015-08-26T04:20:08+5:30

लंकेविरुद्ध दुसरी कसोटी मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर उत्साही झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी मंगळवारी बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला.

Bhajji's 'Tuk-Tuk Safari' | भज्जीची ‘टुक-टुक’ सफारी

भज्जीची ‘टुक-टुक’ सफारी

कोलंबो : लंकेविरुद्ध दुसरी कसोटी मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर उत्साही झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी मंगळवारी बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला.
भारतीयांचा आज विश्रांतीचा दिवस होता. अशा वेळी कोहलीसह अनेक खेळाडूंना बॅडमिंटन खेळण्याचा मोह आवरला नाही. बीसीसीआयचे टिष्ट्वटर हॅन्डल, तसेच टीम इंडियाच्या अधिकृत फेसबुकवर कोहलीशिवाय हरभजन, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि चेतेश्वर पुजारा हे बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. याशिवाय भज्जी हा शहरात टूक- टूक (आॅटोरिक्षा) चालविताना दिसत असून, कोहली आणि स्टुअर्ट बिन्नी हे मागे बसले आहेत. भारत आणि लंकेदरम्यान तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना २८ आॅगस्टपासून एसएससी मैदानावर खेळला जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Bhajji's 'Tuk-Tuk Safari'