भारताविरुद्ध सर्वोत्तम खेळ करणार : ताहीर
By Admin | Updated: November 10, 2015 23:15 IST2015-11-10T23:15:55+5:302015-11-10T23:15:55+5:30
भारतीय मैदानांवर गोलंदाजांवर पडणाऱ्या दबावाचे समर्थन करताना दक्षिण आफ्रिकेचा हुकमी फिरकीपटू इम्रान ताहीर याने भारताविरुध्द शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत

भारताविरुद्ध सर्वोत्तम खेळ करणार : ताहीर
बंगळुरू: भारतीय मैदानांवर गोलंदाजांवर पडणाऱ्या दबावाचे समर्थन करताना दक्षिण आफ्रिकेचा हुकमी फिरकीपटू इम्रान ताहीर याने भारताविरुध्द शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आगामी सामन्यांसाठी रणशिंग फुंकले.
या मालिकेची सुरुवात होण्याआधीच सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली यांसारख्या भारताच्या दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी आफ्रिकेच्या ताहीरची गोलंदाजी भारतीयांसाठी धोकादायक ठरूशकते, असे भाकीत केले होते. ताहीरनेदेखील काहीप्रमाणत हे भाकीत सत्य ठरवताना आपली छाप पाडली. ३६ वर्षीय ताहीरने आपल्या योजनांविषयी सांगितले, की संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजांवर पडणारा दबाव कमी करण्याचा प्रयत्न करणार. खेळताना येणारा दबाव हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भाग असून यामुळे कामगिरी उंचावण्यास मदत होते.
टी-२०, एकदिवसीय किंवा कसोटी या क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात खेळताना मी कायमच देशासाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजावर संघाची जबाबदारी असल्याने प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार झोकून खेळ करतो, असेही ताहीरने सांगितले. मोहाली येथे झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ताहीरने ७१ धावांत ६ बळी घेतले होते.