बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेची दमदार कामगिरी आशियाई टेनिस स्पर्धा: दुहेरीत पटकावले कांस्यपदक; चिनी-ताईपेच्या जोडीने केली 6-7, 6-2, 10-4 ने मात
By Admin | Updated: September 28, 2014 22:30 IST2014-09-28T22:30:16+5:302014-09-28T22:30:16+5:30
भ़ क़ेगव्हाणे (बार्शी)-

बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेची दमदार कामगिरी आशियाई टेनिस स्पर्धा: दुहेरीत पटकावले कांस्यपदक; चिनी-ताईपेच्या जोडीने केली 6-7, 6-2, 10-4 ने मात
भ क़ेगव्हाणे (बार्शी)- आंतरराष्ट्रीय ख्यातीची व बार्शी (सोलापूर)ची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून, सोलापूर जिल्?ाचे नाव जगाच्या नकाशावर झळकावल़े प्रार्थनाने या आशियाई स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत कांस्यपदक पटकावल़े तिच्या या कामगिरीने संपूर्ण सोलापूर जिल्?ासह बार्शीतील क्रीडा जगतात आनंदोत्सव पसरला आह़ेप्रार्थनाने आज आंतरराष्ट्रीय भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत उपांत्यफेरीच्या लढतीत चिनी ताईपेच्या जोडीविरुद्ध एक तास 35 मिनिटांपर्यंत संघर्ष केला़ मात्र ती फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही़ प्रार्थना-सानिया या जोडीला चिनी ताईपच्या चीन वेई चान आणि सू वेई सिहीन या जोडीकडून 6-7, 6-2, 10-4 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागल़े त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागल़ेया भारतीय जोडीने सुरुवातीच्या सेटमध्ये कडवे आव्हान दिल़े मात्र ताईपच्या जोडीने जवळपास एक तासात हा सेट जिंकण्यात यशस्वी झाला़ भारतीय खेळाडूंनी दुसर्या सेटमध्ये परती केली आणि हा सेट केवळ 32 मिनिटांमध्ये आपल्या नावे केला़ मात्र निर्णायक सेट ताईपेच्या जोडीसाठी खूपच सोपा ठरला़ हा सेट त्यांनी अवघ्या 10 मिनिटांमध्ये 10-4 अशा फरकाने जिंकला़