प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' जेट पण नसतं; बबिता फोगाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:51 AM2020-07-28T11:51:51+5:302020-07-28T11:53:15+5:30

दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून एकूण ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना घेण्याचा करार भारताने चार वर्षांपूर्वी केला होता

Because of Prime Minister Narendra Modi we have 'Raphael'; Babita phogat tweet | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' जेट पण नसतं; बबिता फोगाट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' जेट पण नसतं; बबिता फोगाट

Next

भारताने फ्रान्सकडून घेतलेल्या अफाट मारकशक्तीच्या व अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज अशा पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सोमवारी फ्रान्समधून भारताकडे रवाना झाली. दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून एकूण ३६ राफेल विमाने ५९ हजार कोटी रुपयांना घेण्याचा करार भारताने चार वर्षांपूर्वी केला होता व दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनची अडचण येऊनही कंपनीने त्यापैकी पहिल्या तुकडीतील विमाने ठरल्यावेळी सुपूर्द केली आहेत.

भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ यांनी ही विमाने घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांशी मेरीग्नॅक हवाईतळावर बातचीत करून त्यांना शुभेच्छापूर्वक निरोप दिला. राजदूत म्हणाले की, ''आमच्या हवाईदलाने ही विमाने प्रत्यक्ष वापरून पाहिली आहेत व ती अत्यंत चपळ, अचूक,बहुपयोगी व घातक मारा करू शकणारी असल्याची पोंचपावती त्यांनी मिळविली आहे. ही सर्वोत्तम वैमानिकांकडून चालविली जाणारी सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत. थोडक्यात त्यांना तुम्ही ‘ब्युटी’ व ‘बीस्ट’असे दोन्हीही म्हणू शकता.''

राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सोमवारी फ्रान्समधून भारताकडे रवाना झाल्यानंतर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाटनं ट्विट केलं. तिनं लिहिलं की,''प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' पण नसता.''

7000 किलोमीटरचा प्रवास

मॅरिग्नॅक हवाईतळावरून ही विमाने बॉर्डेक्स या बंदराच्या शहरात गेली. तेथून ती भारतापर्यंतचा सात हजार किमीचा प्रवास करताना एकदा हवेतच इंधन भरून घेतील व संयुक्त अरब अमिरातींमध्ये एक थांबा घेऊन आज अंबाला येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर दाखल होतील.

Web Title: Because of Prime Minister Narendra Modi we have 'Raphael'; Babita phogat tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.